शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात नवरी मिळेना नवऱ्याला! उपवर मुलांच्या पित्यांची सुनबाई शोधण्यासाठी कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 15:30 IST

'नाही हाती काम धंदा, म्हणून लग्नाचा झाला वांदा' अशा कोंडीत अनेक तरुण सापडले आहेत.

- विलास ताजने

शिंदोला(यवतमाळ) : गेल्या वर्षीपासून बापूच लगीन कराचं होत... पण ह्या कोरोनामुळे बापूची नोकरी गेली...अन् बापू गावाला आला... नोकरी नाही, कामधंदा नाही...म्हणून बापूच लगीन जुळतं नाय... अशाप्रकारचे संवाद वाणीसह   जिल्हाभरात ग्रामीण भागातील उपवर मुलांच्या आईवडिलांकडून ऐकू येत आहेत.  कोरोनामुळे नोकरी गेल्याने मुलांचे लग्न जुळणे कठीण झाले आहे. म्हणून उपवर पित्यांना सुनबाई शोधण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

लग्न जोडणी म्हटलं की, पूर्वी शेतीला महत्वाचे स्थान होते. वर मुलगा काय करतो, यापेक्षा मुलाकडे किती शेती आहे. कुटुंब कसे आहे, त्याची गावात प्रतिष्ठा कशी आहे, मामकुळ कोणतं ? या बाबींना महत्त्व दिलं जायचं. मात्र आता काळानुरूप यात बदल झाला आहे. मुलगा शेती करतो, असे सांगितले की मुलीच्या कुटुंबाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची वास्तविकता आहे. व्यसनाधीन, भूमिहीन, अल्पभूधारकच नव्हे तर शेतकरी तरूणांची लग्न न जुळण्याची मोठी सामाजिक समस्या गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाली आहे. अशातच गेल्या वर्षापासून लागलेल्या कोरोनारूपी ग्रहणामुळे शहरात छोटी मोठी नोकरी करणाऱ्या तरूणांच्या नोकऱ्या गेल्या. परिणामी नोकरदार तरूण मुळगावी परतले. यामुळे बेरोजगारीत भर पडली. याचा परिणाम भावी नवरदेवांच्या लग्नावर झाला आहे. 'नाही हाती काम धंदा, म्हणून लग्नाचा झाला वांदा' अशा कोंडीत अनेक तरुण सापडले आहेत. प्रत्येक आईवडिलांना आपली मुलगी सुखी घरी पडावी अशी अपेक्षा असते. नोकरीत असलेल्या मुलांना अधिक पसंती दिली जाते. मात्र, गरीब असो वा श्रीमंत शेतकरी मुलाला मुलगी देण्यास आईवडील मागेपुढे पाहतात. कोरोनाच्या संकटामुळे अनेक तरूण मोठ्या शहरातून गावात आले. काही तरूण पुन्हा शहरात परत गेले. मात्र, कोरोनाच्या काळात निर्माण झालेल्या नोकरीच्या अनिश्चित सावटामुळे बरेच युवक खेड्यातच रमले. शेती किंवा अन्य व्यवसाय करू लागले. तथापि सद्यस्थितीत उपवर मुलींची संख्या कमी असल्याने तरूणांचे लग्न जुळणे कठीण झाले आहे. परिणामी उपवर मुलांच्या वडिलांची फारच दमछाक होत आहे. लग्नाचं वय झालेली मुलं अविवाहित राहण्याची चिंता अनेक मुलांच्या पालकांना सतावत असल्याची वास्तविकता आहे.

टॅग्स :marriageलग्नFamilyपरिवारSocialसामाजिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस