शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

६० वर्षांत दुसऱ्यांदा झेडपीवर प्रशासकराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 05:00 IST

राज्यात १९६२ मध्ये जिल्हा परिषदांची स्थापना झाली, तेव्हापासून आजतागायत लोकप्रतिनिधीच जिल्हा परिषदेचा गाडा हाकत आहेत. यापूर्वी एकदा तब्बल १२ वर्षे निवडणूक झाली नव्हती. त्या दरम्यान १९९१-९२ मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेषकुमार शर्मा यांची प्रशासक म्हणून काही महिन्यांसाठी नियुक्ती झाली होती.  यावेळी पदाधिकाऱ्यांची मुदत संपताच २१ मार्चपासून प्रशासक बसविण्यात आला आहे. 

रवींद्र चांदेकरलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : १९६२ मध्ये स्थापना झाल्यापासून ६० वर्षांच्या कार्यकाळात  दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर प्रशासकराज सुरू झाले आहे. २० मार्चला विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्यामुळे २१ मार्चपासून प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कारभार हाती घेतला आहे. राज्यात १९६२ मध्ये जिल्हा परिषदांची स्थापना झाली, तेव्हापासून आजतागायत लोकप्रतिनिधीच जिल्हा परिषदेचा गाडा हाकत आहेत. यापूर्वी एकदा तब्बल १२ वर्षे निवडणूक झाली नव्हती. त्या दरम्यान १९९१-९२ मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेषकुमार शर्मा यांची प्रशासक म्हणून काही महिन्यांसाठी नियुक्ती झाली होती.  यावेळी पदाधिकाऱ्यांची मुदत संपताच २१ मार्चपासून प्रशासक बसविण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून देवराव आनंदराव चौधरी यांनी १९६२ पासून १९६७ पर्यंत कामकाज सांभाळले. त्यानंतर १९६७ ते ७२ पर्यंत सदाशिवराव ठाकरे, १९७२ ते ७७ पर्यंत सुधाकरराव नाईक, १९७७ ते ७८ पर्यंत सुधाकरराव पाटील, १९७८ ते ७९ पर्यंत पुरुषोत्तम इंगोले, १९७९ ते ८५ पर्यंत पुन्हा सदाशिवराव ठाकरे, १९८५ ते ८७ पर्यंत गोविंदराव पाटील, १९८७ ते १९९० पर्यंत प्रल्हादराव बोक्से यांनी कामकाज सांभाळले. त्यानंतर ॲड. निलय नाईक, शुभमताई इंगोले, अशोकराव घारफळकर, वेणुताई काटवले, भाऊराव चौधरी, माणिकराव मेश्राम, अनुसयाताई चौधरी, रमेशराव चव्हाण, संध्याताई सव्वालाखे, ॲड. प्रफुल्ल मानकर, प्रतिभाताई खडसे, प्रीतिलाताई दुधे, राहुल ठाकरे, प्रवीण देशमुख, डॉ. आरतीताई फुपाटे, माधुरी आडे आणि कालिंदा पवार यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. १९७८ पासून तब्बल बारा वर्षे निवडणूकच झाली नव्हती. त्या काळात चौघांनी अध्यक्षपद सांभाळले. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतानाच सदाशिवराव ठाकरे खासदार म्हणूनही निवडून आले होते. सुधाकरराव नाईक अध्यक्ष पदानंतर थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपालही झाले होते. आता ६० वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासकराज आले आहे. 

 दोन निवडणुका टळल्या- १९६२ मध्ये जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यानंतर दर पाच वर्षांनी निवडणूक होणे अपरिहार्य होते. त्यानुसार १९७७ पर्यंत दर पाच वर्षांनी निवडणुका झाल्या. मात्र, त्यानंतर १९८२ आणि १९८७ ला निवडणूक न होता थेट १९९२ मध्येच निवडणूक झाली. या काळात पाचजणांनी अध्यक्षपद सांभाळले. १९७७ ते १९९२ याच काळात एकदा राज्यातील सर्व जिल्हा परिषदा शासनाने बरखास्त केल्या होत्या. मात्र, एकमेव यवतमाळ जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना तीन वर्षांची मुदतवाढ मिळाली होती. आता दुसऱ्यांदा प्रशासकांच्या हाती जिल्हा परिषदेचा कारभार सोपविण्यात आला.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद