शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १४ हजार वाहनांवर केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:01 IST

जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडण्याच्या सूचना होत्या. मात्र जिल्ह्यातील नागरिक या सूचना पाळण्यास तयार नाही. पोलीस प्रशासनाची वाहने गल्लीबोळातून वारंवार सूचना देत फिरत आहे. यानंतरही नागरिकांची वाहने कमी झाली नाही. वर्दळ कमी करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी काही नियम बदलविण्यात आले.

ठळक मुद्दे२४ लाखांचा दंड : एसपी पुन्हा उतरले रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कलम १८८ आणि १४४ नुसार जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. संचारबंदीतही रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी झाली नाही. यामुळे वाहतूक शाखेने का२वाईचा बडगा उगारत जिल्हाभरात १४ हजार वाहनांवर कारवाई केली. बुधवारी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार स्वत: रस्त्यावर उतरले होते.जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडण्याच्या सूचना होत्या. मात्र जिल्ह्यातील नागरिक या सूचना पाळण्यास तयार नाही. पोलीस प्रशासनाची वाहने गल्लीबोळातून वारंवार सूचना देत फिरत आहे. यानंतरही नागरिकांची वाहने कमी झाली नाही. वर्दळ कमी करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी काही नियम बदलविण्यात आले. वेळापत्रक बदलविल्यानंतरही ही गर्दी कमी होत नाही. हे पाहून पोलीस अधीक्षक एम. राज कुमार बुधवारी स्वत: विविध चौकांमध्ये जाऊन पाहणी करून आले. यावेळी त्यांना अनेक धक्कादायकबाबी दृष्टीस पडल्या.कुठलेही काम नसताना युवक रस्त्यांवर वाहने चालवितात. त्यांच्याकडे परवाना नसतो. अशा स्थितीत सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. एका वाहनावर एक नव्हे तर तीन-तीन जण बसतात. विशेष म्हणजे वर्दळ कमी झाल्याने वन वे मधूनही वाहने येताना दिसून आले. पोलीस विभागाने संचारबंदी लागू झाल्यापासून मंगळवारपर्यंत जिल्ह्यात १४ हजार वाहनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून २४ लाख २८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. यापुढे कारवाई तीव्र केली जाणार आहे.विनाकारण रस्त्यावर धावणारे वाहन जमा होणारकुठलेही काम नसताना रस्त्यावर येऊ नका, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले. मात्र संचारबंदी कशी आहे हे पाहण्यासाठी युवक रस्त्यांवर उतरत आहे. अनेकांना आपण कशासाठी बाहेर आलो, याचे उत्तरच पोलिसांना सांगता आले नाही. यापुढे विनाकारण रस्त्यावर वाहने चालविल्यास, अशा वाहनांना जमा करण्याच्या सूचना वाहतूक शाखेने संबंधितांना दिल्या आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या