Next

योगी आदित्यनाथ यांच्याकडे काय काय आहे? CM Yogi Adityanath Property | UP Election 2022

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 04:05 PM2022-02-10T16:05:50+5:302022-02-10T16:06:13+5:30

भगवे कपडे, पारखी नजर, धडाडीची चाल, प्रशासनावर वचक आणि कामांचा तडाखा या सर्वांचं मिश्रण म्हणजे योगी आदित्यनाथ.. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वात प्रसिद्ध मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांच्याच नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात भाजप निवडणुका लढवतोय. यूपीतील भाजपचा चेहरा असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. विशेष म्हणजे पाचवेळा खासदार झालेले योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवतायत...शुक्रवारी योगींनी गोरखपूर शहर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जादरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे.