Next

शिक्षण महत्वाचं की पेहराव, तुम्हाला काय वाटतं? Karnataka Hijab Row | 'Bikini, Ghoonghat, Jeans'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 04:03 PM2022-02-10T16:03:39+5:302022-02-10T16:04:12+5:30

कर्नाटकात महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावर वाद पेटला. आणि हा वाद इतका विकोपाला गेला की, देशात त्यावरुन टीका-टीप्पणी सुरु आहे. काहींनी विरोध केला, काहींनी समर्थन केलंय. तर काहींनी यात धर्म आणू नका, असं म्हटलंय. पण भारतात ज्या गोष्टीत धर्म किंवा आणली जात नाही, ती गोष्ट चर्चेत येत नाही. हिजाबच्या या वादाला धार्मिक वळण मिळालं. धार्मिक वाद आला की राजकारणी येतात. आता या वादात प्रियांका गांधींनीही उडी घेत एक ट्विट केलं. बिकिनी असो की घुंगट, जीन्स असो की हिजाब, काय परिधान करायचं, हे ठरण्याचा अधिकार स्त्रीला आहे. संविधानानं दिलेला हा ‘गॅरंटीड’ अधिकार आहे. त्यामुळे महिलांचं शोषण करणं थांबवा, असं ट्वीटर प्रियंका गांधींनी म्हटलं. त्यावरुन राहुल गांधी समर्थनार्थ ट्विट केलं. प्रियांका गांधी म्हणाल्या ते अगदी बरोबर आहे. पण या ट्विटवरुन मात्र प्रियांका गांधींना ट्रोल केलं जातंय...