Next

नगरसेवक, आमदार, खासदार... बिचुकलेने काय नाही केलं? Abhijit Bichukale Property, Lifestyle

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 03:01 PM2022-01-28T15:01:13+5:302022-01-28T15:01:45+5:30

नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी अर्ज भरणारा भारतातील एकमेव माणूस म्हणजे अभिजीत बिचुकले... कधी आमदारकी तर कधी खासदारकीसाठी या माणसाने निवडणूक लढवली... तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान होणार असं ठामपणे अनेकवेळा सांगितलं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच ठरवणार हे कधी ना पवार ठामपणे म्हणाले, ना मुंडे, ना ठाकरे... पण अभिजीत बिचुकलेंनी बॅनर लावून हे सांगितलं. त्यामुळे माणूस इतका अति आत्मविश्वासी कसा असू शकतो.. असंच मिश्किलपणे बिचुकलेंच्या बाबतीत म्हटलं जातं. आता तर बिचुकलेने सलमान खानशीच पंगा घेतलाय. सलमानसारखे १०० जण मी दाराशी उभे करीन आणि गल्ली झाडायला लावीन, असंही बिचुकले म्हणाला.. अशा या अवलिया माणसाची संपत्ती किती असेल... या माणसाचे उत्पन्न किती असेल अशी चर्चाही अनेकवेळा होते...