Next

फ्रान्स-ऑस्ट्रिया हल्ल्यानंतर जगावर दहशतवादाचे संकट का? France - Austria Terrorism Attack

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 10:57 AM2020-11-04T10:57:04+5:302020-11-04T10:57:43+5:30

व्हिएतनाममध्ये सहा ठिकाणी गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांकडून एक हल्लेखोर मारला गेला असून दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय. इतर हल्लेखोराचा शोध सुरू असल्याचंही सांगितलं जातंय. सोमवारी रात्री ८ वाजता हा गोळीबार सुरु झाला. ऑस्ट्रिया पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याच्या तयारीत असतानाच हा गोळीबार झाला. लॉकडाउन लागू होणार असल्याने बार आणि रेस्तराँमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे हल्ला करणाऱ्यांनी गर्दी असलेला या भागात हल्ला केल्याचं सांगितलं जातंय.