शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कारखेडा ग्रामपंचायत करणार शिक्षकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST

मानोरा तालुक्यातील उत्कृष्ट, सर्जनशील, उपक्रमशील शिक्षकांचा गौरव, सन्मान व्हावा या हेतूने कारखेडा ग्रामपंचायत अशा शिक्षकांचा दरवर्षी ५ सप्टेंबरला डॉ. ...

मानोरा तालुक्यातील उत्कृष्ट, सर्जनशील, उपक्रमशील शिक्षकांचा गौरव, सन्मान व्हावा या हेतूने कारखेडा ग्रामपंचायत अशा शिक्षकांचा दरवर्षी ५ सप्टेंबरला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी म्हणजेच शिक्षक दिनी भव्य सत्कार सोहळा आयोजित करून अशा शिक्षकांचा सत्कार व सन्मान करते. यंदाही अशा शिक्षकांचा सत्कार व सन्मान करण्यासाठी ग्रामपंचायतीने शिक्षकांची निवड केली आहे.

प्राथमिक विभागातून वक्तशीरपणा आणि नियमितपणासाठी जि. प. प्राथमिक शाळा यशवंत नगरचे पुंडलिक किसनराव राऊत, तसेच जिल्ह्यातून पहिली आयएसओ शाळा करणारे उमेश शेषराव हाके, सहायक शिक्षक, जि. प. शाळा माहुली यांची नावे जाहीर झालेली आहेत.

माध्यमिक विभागातून दुर्गम भागातील शाळा असूनही गुणवत्ता वाढविणारे श्री वसंतराव नाईक विद्यालय पाळोदीचे मुख्याध्यापक वसंत गोविंद चव्हाण व शाळेला सर्वस्व समजणारे श्री अंबिका विद्यालय गव्हा येथील शिक्षक विजय सुखदेव मनवर यांची निवड झालेली आहे.

मुलींच्या कबड्डी संघाला राष्ट्रीय स्तरापर्यंत नेणारे इंदिरा गांधी कन्या विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्याम वानखडे यांची क्रीडा विभागातून निवड झालेली आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन विभागातून प्रा. अनिस अहमद अन्सारी रहेमानिया कनिष्ठ उर्दू महाविद्यालय, मानोरा यांची निवड झालेली आहे.

उच्च महाविद्यालयीन विभागातून महाविद्यालयात प्राणीशास्त्र या विषयासंबंधी नावीण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या डॉ. सीमा वीरभान केशवानी मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय मानोरा यांची निवड झालेली आहे.

००००००००००००००००००

तहसीलदारांच्या हस्ते होणार सन्मान

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या औचित्यावर तहसीलदार शारदा जाधव, ठाणेदार सुनील जाधव, गटशिक्षणाधिकारी अनिल पवार यांच्या हस्तेकारखेडा ग्रामपंचायत सरपंच सोनाली बबनराव देशमुख व उपसरपंच अनिल काजळे, तसेच ग्रामपंचायत सचिव सूर्य यांचे स्वाक्षरी असलेले सन्मानपत्र दिले जाणार आहे.