शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

हजारो नुकसानग्रस्तांच्या बांधावर पोहचलीच नाही प्रशासकीय यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 2:15 PM

अनेक नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतात प्रशासकीय यंत्रणा पोहचू शकली नसल्याची वस्तूस्थिती आहे.

- सुनील काकडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवेळी कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये नैसर्गिक आपत्ती ओढवली. त्यात हजारो हेक्टरवरील खरीपाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, ४ नोव्हेंबरअखेर ७१ हजार शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला आहे. असे असले तरी अनेक गावांमधील शेतशिवारांमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल साचून असल्याने अद्यापपर्यंत हजारो नुकसानग्रस्तांच्या बांधावर प्रशासकीय यंत्रणा पोहचू शकली नसल्याची वस्तूस्थिती आहे.आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वदूर सातत्याने कोसळलेल्या अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. विविध स्वरूपातील अडचणींचा सामना करून शेतकऱ्यांनी महत्प्रयासाने पिकविलेले सोयाबिन सोंगून त्याच्या सुड्या रचल्या; मात्र अशातच अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबिनच्या सुड्या पूर्णत: ओल्या होऊन त्यास चक्क कोंब फुटण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत. मानोरा, मंगरूळपीर आणि कारंजा या तालुक्यांमध्ये सोयाबिनसोबतच नगदी व हमखास पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कपाशीचे विक्रमी उत्पन्न घेतले जाते. यंदा मात्र कपाशी ऐन बहरात असतानाच पावसाच्या दणक्याने कपाशीचे बोंडे काळे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास वातावरणात निर्माण होत असलेल्या धुक्यामुळे हळद या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन हे पिकही शेतकºयांच्या हातातून निसटत चालल्याचे एकंदरित चित्र आहे.दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी, कोराडी आणि येळेगाव ही तीन धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने त्यातील पाणी पैनगंगा नदीत सोडण्यात आल्याने या नदीला महापूर येऊन रिसोड तालुक्यातील अनेक गावांमधील शेती व त्यातील उभी पिके, सोयाबिनच्या सुड्यांचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, शासनाच्या आदेशावरून महसूल विभाग व कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण व पंचनाम्यांची कामे तातडीने हाती घेतली आहेत; मात्र नुकसानग्रस्त शेतकºयांची संख्या कितीतरी पटीने अधिक असताना त्यातुलनेत प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसणे आणि अनेक गावांमधील शेतात मोठ्या प्रमाणात चिखल साचून असल्याचा फटका नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनामा प्रक्रियेस बसत आहे. यामुळे आजही (४ नोव्हेंबर) अनेक नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतात प्रशासकीय यंत्रणा पोहचू शकली नसल्याची वस्तूस्थिती आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पंचनामे केव्हा होणार, त्याचे अहवाल जिल्हा प्रशासनाकडून राज्यशासनाकडे कधी सादर होणार आणि झालेल्या नुकसानापोटी अर्थसहाय्य नेमके कधी मिळणार, आदी प्रश्नांनी शेतकºयांना घेरले आहे.

जिल्ह्यात अवेळी कोसळलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे काम महसूल विभाग व कृषी विभागाच्या वतीने केले जात आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत प्रशासनाने ७१ हजार शेतकºयांच्या शेतातील नुकसानाचे पंचनामे पूर्ण केले असून उर्वरित शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामेही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. जिल्ह्यातील काहीठिकाणी शेतशिवारांमध्ये पाणी साचून असल्याने नुकसानाचे सर्वेक्षण व पंचनामे प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होत आहे. अशाही बिकट स्थितीत प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचारी राबत आहेत.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारीवाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी