शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरची अ‍ॅपेला धडक; एक ठार, सहा जखमी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 21:04 IST

नागपूरवरुन मेहकरकडे जाणा-या भरधाव कंटेनरने एका अ‍ॅटोला जबर धडक दिल्याने अ‍ॅटोमधील एक जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना ११ सप्टेंबरला सकाळी ११.३० वाजता  सुमारास मालेगाव-मेहकर मार्गावरील नवीन बायपासजवळच्या टी पॉर्इंट जवळ घडली. याप्रकरणी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देभरधाव कंटेनरची आॅटोला जबर धडकमालेगाव-मेहकर बायपासवरील टी-पॉर्इंटजवळ घडली घटनागंभीर जखमी रामचंद्र ढोके यांचा उपचारादरम्यान मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : नागपूरवरुन मेहकरकडे जाणा-या भरधाव कंटेनरने एका अ‍ॅटोला जबर धडक दिल्याने अ‍ॅटोमधील एक जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना ११ सप्टेंबरला सकाळी ११.३० वाजता  सुमारास मालेगाव-मेहकर मार्गावरील नवीन बायपासजवळच्या टी पॉर्इंट जवळ घडली. याप्रकरणी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.तालुक्यातील कळंबेश्वर येथून एम.एल.३७ बी ६२३६ क्रमांकाचा अ‍ॅटोचालक साहेबराव चिंतामण वानखेडे रा.कळंबेश्वर  हे उडदाचे पोते घेऊन प्रवाशांसह मालेगाव येथे येत होते. वडप गावानजीकच्या नवीन बायपासवर नागपुरकडुन भरधाव येणाºया एच.आर. ३८ एन. ५९५० क्रमांकाचा कंटेनर चालक दिपकसिंग दारासिंग (२१) रा. मथुरा (उत्तरप्रदेश) याने याने निष्काळजी वाहन चालविल्याने अ‍ॅटोला जबर धडक बसली. या अपघातात अ‍ॅटोमधील रामचंद्र गोपाल ढोके (५०)रा.कळंबेश्वर यांच्या डोक्याला जबर मार लागला. अति रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मालेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला तर या अ‍ॅपेमधील प्रवासी भाऊराव काशीनाथ चतरकर (७१), रामकौर भाऊराव चतरकर, रामभाऊ गोविंद वंजारे (३०), लक्ष्मी   रामभाऊ वंजारे रा.कळंबेश्वर व वडप येथील महाजन व अन्य एक असे एकुण सहा प्रवासी जखमी झाले. अपघाताबाबत मालेगाव पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय गवई, पोहेकाँ तानाजी ढेंगळे, खोडके, नारायण वाघ, नारायण सरकटे, आशिष किल्लेकर हे घटनास्थळी दाखल झाले.सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथे उपचाराकरिता हलविले. कंटेनर चालक दिपकसिंग दारासिंग हा वाहन घेवुन घटनास्थळावरुन मेहकरमार्गे पसार झाला. याबाबत ए.पी.आय गवई यांनी डोणगाव पोलिसांना माहिती दिल्यानंतर डोणगाव पोलिसांनी डोणगाव येथे कंटेनर व चालकाला ताब्यात घेवुन मालेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी शेषराव चोखाजी भालेराव (५२) रा.कळंबेश्वर यांनी मालेगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. यावरुन कंटेनर  चालक दिपकसिंग यांच्याविरुध्द भादंवी कलम २७९, ३३७, ३३८, सह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय गवई हे करीत आहेत.-