शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

पालघरच्या समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेली बोट बुडाली; मच्छीमार बांधव सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 16:16 IST

ही बोट वाचविण्यासाठी घिवली, दांडी, डहाणू आदी भागातील मच्छीमार आपल्या बोटी घेऊन घटनास्थळी मदतकार्यासाठी पोहोचल्या आहेत.

पालघर:-  तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या शेजारील घिवली गावातील दर्शन पाटील ह्यांची "उद्धारी माता प्रसन्न" ही बोट गुरुवारी रात्री मासेमारीसाठी गेली असताना खडकावर आदळून बुडाली. यातील पाच मच्छीमारांनी पोहत यशस्वीरीत्या खडकांचा आधार घेत आपला प्राण वाचवला. ही बोट वाचविण्यासाठी घिवली, दांडी, डहाणू आदी भागातील मच्छीमार आपल्या बोटी घेऊन घटनास्थळी मदतकार्यासाठी पोहोचल्या आहेत.घिवली येथील दर्शन पाटील हे गुरुवारी रात्री आपल्या चार सहकाऱ्यांसह गावासमोरील समुद्रात "तरती" जाळ्याद्वारे पापलेट, काटी, मुश्या आदी माश्यांची मासेमारी करण्यासाठी गेले होते. जात असताना रात्रीच्या अंधारात समुद्रातील खडकांचा अंदाज न आल्याने त्यांची बोट खडकावर आदळल्याने बोटीला भगदाड पडले. बोटीत पाणी शिरू लागल्याने बोट मालक दर्शन पाटील यांनी आपल्याजवळील मोबाईलद्वारे घरी संपर्क साधून अपघाताची माहिती कळवली. बोट समुद्रात बुडाली असून, आम्ही पोहत बाजूच्या खडकावर आश्रय घेतल्याचे सांगून आता समुद्राला ओहोटी असल्याने पाणी कमी झाल्यावर किनाऱ्यावर येऊ असे कळविले.रात्रीच्या अंधारात अपघातस्थळी जाणे शक्य नसल्याने गावातील बोटींनी सकाळी भरती आल्यावर मदतीसाठी धाव घेतली. डहाणू, दांडी, आदी भागातील समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटींनी ही समुद्रात बुडालेल्या बोटीला सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती घटनास्थळावरून दीपेश तामोरे, नयन तामोरे, कैलास नाईक यांनी लोकमतला दिली. बोट आणि जाळी आदी साहित्यासह बोटमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.