शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारी बंदीवरून केंद्र - राज्यात गोंधळ; केंद्राचा आदेश १५ जूनपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 01:35 IST

राज्य सरकार म्हणते १ जूनपासून बंदी

- हितेन नाईकपालघर : महाराष्ट्र शासनाचा मासेमारी बंदी कालावधी १ जूनपासून आहे. तर केंद्र शासनाने हाच कालावधी १५ जूनपासून असल्याचे आदेश काढले आहेत. तर राज्य शासनाने १ जून ते ३१ जुलै असे मासेमारी बंदीचे आदेश काढले आहेत. केंद्र आणि राज्य शासनामधील समन्वयाच्या अभावाचा फटका मच्छीमारांना बसत असून कोणाचे आदेश पाळावेत, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

१ जून ते ३१ जुलै या कालावधीत समुद्रात वादळी वारे वाहून जीवित वा वित्तहानी होऊ नये तसेच मासे प्रजननक्षम बनून लहान पिल्लांची चांगली वाढ व्हावी म्हणून प्रत्येक वर्षी राज्य शासन पावसाळी मासेमारी बंदी कालावधी घोषित करते. परंतु मार्च महिन्यात अंड्यातून बाहेर आलेली पापलेट, बोंबील, दाढा, रावस आदी माशांची लहान पिल्ले समुद्रात विहार करीत असताना मे महिन्यात अशा लहान पिल्लाची पुरेशी वाढ होऊ न देता त्यांची मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. त्यामुळे माशांची पुरेशी वाढ न होता लहान पिलांची बेसुमार कत्तल केली जात असल्याने माशांचे समुद्रातील उत्पादन घटू लागले होते. त्यामुळे १ मे ते ३१ जुलै असा तीन महिन्याचा मासेमारी कालावधी केंद्र आणि राज्य शासनाने घोषित करावा, अशी मागणी सहकारी संस्था, मच्छीमार संघटना करीत आल्या आहेत.

पावसाळी मासेमारी बंदी कालावधी कमी पडत असल्याने तो वाढून मिळावा यासाठी एनएफएफ या राष्ट्रीय संघटनेबरोबरच महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने अनेक आंदोलने केली असताना केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त डॉ. संजय पांडे यांनी २० मार्च रोजी एक आदेश पारित केला आहे. या आदेशान्वये पूर्व किनारपट्टी भागात १५ एप्रिल ते ३१ मे असा, तर पश्चिम किनारपट्टीवर १५ जून ते ३१ जुलै असा पावसाळी बंदी कालावधीचा नवीन आदेश पारित केला आहे. मच्छीमारांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला हरताळ फासत १५ दिवस मासेमारी कालावधी कमी केल्याने मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या वर्षीही राज्य शासनाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडून सहकारी संस्थांना १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा पावसाळी बंदी कालावधीचा आदेश आल्यानंतर आता नव्याने केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहआयुक्तांकडून राज्य शासनाच्या १२ सागरी मैल पुढे असलेल्या ईईझेड क्षेत्रात १५ जूनपर्यंत मासेमारी करता येणार आहे. परंतु राज्य शासनाच्या १२ सागरी मैल (नॉटिकल) भागातून जिल्ह्यातील मच्छीमार मासेमारीला ईईझेड क्षेत्रात गेल्यास मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाईची भूमिका असेल का? याबाबत वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शन मागवीत असल्याचे पालघर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य पाटील यांनी सांगितले. मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकांचा करारही ३१ मे रोजी संपत असल्याने मत्स्यव्यवसाय विभाग कारवाई करू शकणार नाही.

केंद्र शासनाने ६१ दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी १५ दिवसांनी कमी केला असून १ जूनपासून ओएनजीसीचा सर्व्हे सुरू होत असल्याने अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने सर्व किनारपट्टीवर मच्छीमार काळे झेंडे दाखवून शासनाचा निषेध करणार आहेत.- दामोदर तांडेल, अध्यक्ष,अखिल मच्छीमार कृती समिती

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCentral Governmentकेंद्र सरकार