शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

विकासात अडसर ठरलेल्या वृक्षांवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST

मानवाला शुद्ध ऑक्सिजन पुरविण्यासोबतच वृक्ष पर्यावरणात मोलाची भूमिका बजावतात. जिल्ह्याच्या चहूबाजूने मोठी वनसंपदा आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या जीवघेण्या विकासकामांमुळे वनसंपदेवरच घाला घातला जात आहे. बुटीबोरी-तुळजापूर मार्गाचे सिमेंटीकरण आणि रुंदीकरण पूर्णत्वास गेले. या मार्गाच्या बांधकामावेळीही हजारांवर वृक्षांची कत्तल करण्यात आली.

ठळक मुद्देसेवाग्राम ते आष्टा फाटा : हिरवळीअभावी मार्ग ओसाड; पर्यावरणप्रेमीत व्यक्त होतोय संताप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विविध योजनांच्या नावाखाली वृक्षलागवडीचा देखावा आणि दुसरीकडे विकासकामांत अडसर ठरणाऱ्या डेरेदार वृक्षांची बेसुमार तोड, असा उफराटा प्रकार तत्कालीन सरकारच्या काळापासून जिल्ह्यात सुरू आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींत संतापाची लाट आहे.सेवाग्राम ते आष्टा फाट्यापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि बांधकाम केले जात आहे. हा रस्ता वर्धा-हिंगणघाट मार्गाला जोडला जाणार आहे. या रस्त्याच्या बांधकामाचा कंत्राट एसीसी कंपनीला मिळाला आहे. सेवाग्राम ते आष्टा फाट्यापर्यंत यापूर्वी दुतर्फा असलेल्या वृक्षराजीमुळे चांगली हिरवळ दाटलेली होती. रस्ता बांधकामात अडसर ठरल्याने ५० ते १०० वर्षांपूर्वीच्या विविध प्रजातींच्या हजारावर डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. या मार्गाने गेले असता दुतर्फा तोडलेली झाडे पडलेली दृष्टीस पडत असून हे चित्र संताप आणणारे ठरत आहे.मानवाला शुद्ध ऑक्सिजन पुरविण्यासोबतच वृक्ष पर्यावरणात मोलाची भूमिका बजावतात. जिल्ह्याच्या चहूबाजूने मोठी वनसंपदा आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या जीवघेण्या विकासकामांमुळे वनसंपदेवरच घाला घातला जात आहे.बुटीबोरी-तुळजापूर मार्गाचे सिमेंटीकरण आणि रुंदीकरण पूर्णत्वास गेले. या मार्गाच्या बांधकामावेळीही हजारांवर वृक्षांची कत्तल करण्यात आली. तसेच शहरातील दादाजी धुनिवाले चौक ते आर्वी नाकापर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले. आर्वी नाका ते जुनापाणी चौकापर्यंतही रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरण झाले. या सर्वच कामात आड येणाºया डेरेदार वृक्षांची बेसुमार तोड करण्यात आली. त्यामुळे एकेकाळी हिरवेपण असलेले हे मार्ग आज ओसाड झाले आहेत.प्रशासनाकडून संबंधित मार्गांलगत वृक्षलागवड करण्यात येईल, असे प्रारंभी सांगण्यात आले होते. मात्र, चार वर्षांचा काळ लोटूनही वृक्षलागवड करण्यात आलेली नाही. याकडे शासन आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वृक्षतोड थांबवावी अथवा विकासकामांना स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.विकासकामे थांबवासेवाग्राम ते आष्टा फाट्यापर्यंत रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. याकरिता मोठ्या प्रमाणावर वृक्षांचा बळी घेण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात हा मार्गही ओसाड होण्याच्या मार्गावर आहे. शासन वृक्षलागवडीकरिता विविध योजना राबवित असले तरी वृक्षतोडीच्या प्रमाणात लागवड नाही, ही वस्तुस्थिती आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. असा जीवघेणा विकास नको, असा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास करणारी विकासकामे थांबवावी, अशी मागणी वर्धेकर नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग