शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीला ताडपत्रीचा आधार

By admin | Updated: July 21, 2014 00:20 IST

तालुक्याचे ठिकाण असलेल्या सेलू येथील शासकीय कार्यालयांच्या इमारतींवर अवकळा आली आहे़ पावसाळ्यातही ही स्थिती कायमच दिसते़ यामुळेच सध्या येथील पंचायत समिती कार्यालयास

घोराड : तालुक्याचे ठिकाण असलेल्या सेलू येथील शासकीय कार्यालयांच्या इमारतींवर अवकळा आली आहे़ पावसाळ्यातही ही स्थिती कायमच दिसते़ यामुळेच सध्या येथील पंचायत समिती कार्यालयास गळती थांबविण्यासाठी ताडपत्रीचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसते़ शासकीय कार्यालयाची ही दुरवस्था पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे़मंगळवारी आलेल्या साधारण पावसाने पंचायत समिती कार्यालयातील लेखा, पंचायत, आस्थापणा, एमआरजीएस कृषी या एकाच इमारतीत असलेल्या विभागात पाणी गळू लागल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. संगणक सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. याबाबतचे वृत्त लोकमतने गुरूवारी प्रकाशित केले. यानंतर शुक्रवारी पंचायत समितीने या इमारतीच्या कवेलूच्या छतावर ताडपत्री टाकून तात्पुरती का होईना, पाणी गळती थांबविली; पण ६३ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ११० गावांचा कारभार पाहणाऱ्या व लाखो रुपयांची विकास कामे गावात करणाऱ्या पं़स़ ला कायमस्वरुपी उपायोजनेसाठी निधी नसावा वा कार्यालयाची देखभाल दुरुस्ती वेळोवेळी करण्याचा विसर पडावा, हे एक कोडेच आहे.लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार पाहाणाऱ्या पंचायत समितीवर गरीबी दाखविण्याची वेळ आली आहे़ ५२ वर्षे जुनी व जीर्ण झालेल्या इमारतीतून गाडा चालविला जात आहे. माकडाच्या हैदोसाने जुने कवेलू फुटले आहेत़ तालुक्यातील ग्रा़पं़ च्या इमारतीवरून कवेलू दिसेणासे झाले असताना पं़स़ कार्यालयावर आजही कवेलूचे छत दिसते़ राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या तालुक्यातील राजकीय नेत्यांचे कसब यावरून दिसते़ नवीन इमारतीचा प्रस्ताव झाला असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याचा पाठपुरावा का केला जात नाही, हा संशोधनाचा आहे. तात्पुरती व्यवस्था केली असली तरी पावसाने ताडपत्री ओली झाल्यावर ऊन्ह तापल्यास त्या ताडपत्रीचे तुकडे होतात़ यामुळे ही ताडपत्री किती दिवस टिकणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ परिसरात एकेकाळी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानातून तीन विभागाचा कारभार पाहिला जात आहे़ यात शिक्षण, एकात्मिक बाल विकास व पशुधन विभागाच्या कार्यालयावरील कवेलू फुटले आहेत़ मुसळधार पाऊस आल्यास या कार्यालयांतही पाणी गळणार आहे़ शासकीय कार्यालयांना पाणी गळू नये म्हणून ताडपत्रीचा वापर करण्याची वेळ येत असेल तर यापेक्षा दुर्भाग्य कोणते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ कित्येक वर्षांपासून दुरवस्थेतील इमारतींच्या डाडगुजी व दुरूस्तीकडे मात्र कुणीही लक्ष देत नसल्याचे दिसते़(वार्ताहर)