शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दहेगावच्या ठाणेदाराने तक्रारकर्त्यास बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST

प्राप्त माहितीनुसार, हेलोडी गावात सकाळी ११ वाजताच्या सुमारास पिण्याचे पाणी भरण्याच्या कारणातून दोन महिलांचा वाद झाला. त्यातील एक महिला दहेगाव पोलिसात तक्रार देण्यास गेली असता ठाणेदार थोरात यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. याची माहिती महिलेचा भाऊ विजय राऊत यांना मिळाली. त्यांनीही गावातील काही नागरिकांना घेत पोलीस ठाणे गाठले.

ठळक मुद्देव्हिडिओ व्हायरल : तक्रार घेण्यास टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोणतीही चूक नसताना विनाकारण युवकावर खोटे गुन्हे दाखल करीत दहेगाव (गोसावी) पोलीस ठाण्याचे ठाणेदार बाळासाहेब थोरात यांनी पट्ट्याने मारहाण केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विजय बबन राऊत रा. हेलोडी यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनातून केली आहे.प्राप्त माहितीनुसार, हेलोडी गावात सकाळी ११ वाजताच्या सुमारास पिण्याचे पाणी भरण्याच्या कारणातून दोन महिलांचा वाद झाला. त्यातील एक महिला दहेगाव पोलिसात तक्रार देण्यास गेली असता ठाणेदार थोरात यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली.याची माहिती महिलेचा भाऊ विजय राऊत यांना मिळाली. त्यांनीही गावातील काही नागरिकांना घेत पोलीस ठाणे गाठले. नागरिकांनी ठाणेदारांना तक्रार का घेत नाही, अशी विचारणा केली असता संतापलेल्या ठाणेदारांनी तुम्ही विचारणारे कोण, असे म्हणत शिवीगाळ करणे सुरू केले. तसेच विशाल चिंचोळकर याला लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्याने मारहाण केली. ठाणेदारांनी विशालवर खोटे गुन्हे दाखल करीत पदाचा दुरुपयोग केला असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून न्याय देण्याची मागणी विजय राऊत याने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.याप्रकरणात पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.याप्रकरणात यापूर्वी सोमवारी तक्रार घेण्यात आली होती. ज्यांच्या विरोधात तक्रार होती त्यांचीही तक्रार नोंदविण्यात आली होती. गुरुवारी पुन्हा तक्रार प्राप्त झाली. याप्रकरणाशी ज्याचा संबंध नव्हता, तो पोलीस ठाण्यात येवून अरेरावी करीत होता. त्याला समजावून सांगत ठाण्यातून बाहेर जाण्यास सांगितले. पण, त्याने माझ्याशी वाद करून धक्काबुक्की केली. त्यामुळे त्याच्यावर ३५३,१८६,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.- बाळासाहेब थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक, दहेगाव.

टॅग्स :Policeपोलिस