शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडच्या तूर खरेदीचे चुकारे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

नियमाचे पालन करीत तुरीची शासकीय खरेदी सुरू करण्यात आली आहे. मात्र महिन्याभरापासून चुकारे रखडलेले आहे. शासनाने हमीभाव तूर खरेदीकेंद्र सुरू झाल्याची माहिती शेतकऱ्यांना मोबाईल मॅसेजद्वारे दिली आहे. मॅसेज पाठवून बोलविलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जात आहे. दररोज जवळपास १०० क्विंटल तूर खरेदी होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन होताना दिसत आहे.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंग पाळून खरेदी सुरू : चौकशीसाठी शेतकऱ्यांच्या येरझारा

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात ३ मे पर्यंत लॉकडाऊन राहाणार असल्याने २० एप्रिलपासून ग्रीन झोनच्या जिल्ह्यात शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार काही प्रमाणात सुरू करण्यात आले आहे.नियमाचे पालन करीत तुरीची शासकीय खरेदी सुरू करण्यात आली आहे. मात्र महिन्याभरापासून चुकारे रखडलेले आहे. शासनाने हमीभाव तूर खरेदीकेंद्र सुरू झाल्याची माहिती शेतकऱ्यांना मोबाईल मॅसेजद्वारे दिली आहे. मॅसेज पाठवून बोलविलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जात आहे. दररोज जवळपास १०० क्विंटल तूर खरेदी होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन होताना दिसत आहे. शेतकऱ्यांसाठी खरेदीच्या ठिकाणी सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहे. कुठेही गर्दी होवू नये म्हणून खरेदी-विक्री संघाचे कर्मचारी अशोक रनणवरे व ग्रेडर सोनू मेश्राम प्रयत्नशील आहेत. मागील दीड महिन्यापासून खरेदी सुरू आहे. परंतु शेतकऱ्यांना अजूनपर्यंत एकही चुकारा मिळालेला नाही. शेतकरी चुकारा कधी मिळणार यासाठी खरेदीच्या ठिकाणी विचारणा करण्याकरिता येत आहे. चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांना येरझारा घालाव्या लागत आहे.नोंदणी केलेल्यांना फटकासेलू येथेही नाफेडची तूर खरेदी सुरू करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यांना एसएमएस पाठवून तूर आणण्यास सांगण्यात आले. नोंदणीच्यावेळी शेतकऱ्यांनी नोंदविलेल्या नोंदीत खरेदीच्यावेळी स्थानिक कर्मचाऱ्यांनी तफावत निर्माण केल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहे. एका शेतकऱ्याकडून पाच क्विंटलच्या वर तूर घेतली जात नाही. सातबारावरच्या नोंदीकडेही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकºयांना व्यापाºयांना माल द्यावा लागत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarket Yardमार्केट यार्ड