शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्काराकरिता दुचाकीने निघालेल्या झंझाळा येथील माय-लेकांना काळाने वाटेतच हिरावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 05:00 IST

महिंद्रा बाबुराव महाजन-सरडे (३७) व प्रेमिला बाबुराव महाजन-सरडे (६०) दोघेही रा. झंझाळा तह. देवळी असे मृताचे नाव आहेत. तर नयना गजानन देवळे (१५) रा. इंझाळा ही गंभीर जखमी आहे. हे तिघेही एम.एच.३२ -३६१५ क्रमांकाच्या दुचाकीने झंझाळा येथून बोरगाव (हातला) येथे संत परमहंस परशराम बाबा यांच्या अंत्यदर्शनाकरिता जात होते. पिपरी पारगोठाण येथील प्रवासी निवाऱ्यासमोर मागाहून येणाऱ्या भरधाव ट्रकने महिंद्राच्या दुचाकीला जबर धडक दिली. 

ठळक मुद्देपिपरी पारगोठाणच्या प्रवासी निवाऱ्यासमोरील घटना: पंधरा वर्षीय मुलगी गंभीर जखमी, ट्रक घटनास्थळावरुन दहेगाव(मुस्तफा) मार्गाने झाला पसार

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी/पुलगाव : आर्वी तालुक्यातील बोरगाव (हातला) येथे दुचाकीने जात असलेल्या माय-लेकास भरधाव येणाऱ्या ट्रकने चिरडले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला असून सोबत असलेली पंधरा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात पुलगाव-आर्वी मार्गावरील पिपरी पारगोठाण येथील प्रवासी निवाऱ्यासमोर गुरुवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडला.महिंद्रा बाबुराव महाजन-सरडे (३७) व प्रेमिला बाबुराव महाजन-सरडे (६०) दोघेही रा. झंझाळा तह. देवळी असे मृताचे नाव आहेत. तर नयना गजानन देवळे (१५) रा. इंझाळा ही गंभीर जखमी आहे. हे तिघेही एम.एच.३२ -३६१५ क्रमांकाच्या दुचाकीने झंझाळा येथून बोरगाव (हातला) येथे संत परमहंस परशराम बाबा यांच्या अंत्यदर्शनाकरिता जात होते. पिपरी पारगोठाण येथील प्रवासी निवाऱ्यासमोर मागाहून येणाऱ्या भरधाव ट्रकने महिंद्राच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात महिंद्रा व प्रेमिला हे माय-लेकं ट्रकमध्ये सापडल्याने त्यांना चिरडत नेले. त्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला तर नयना ही दूर फेकल्या गेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर ट्रक चालकांने वाहनासह घटनास्थळावरुन पळ काढला. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत आर्वी पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान बावणे, मनिष राठोड व राजू राऊत यांनी घटनास्थळ गाठून जखमी असलेल्या नयनाला आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पंचनामा करुन दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघातातील ट्रकचालक हा दहेगाव (मुस्तफा) मार्गे पसार झाल्याची माहिती गावकऱ्यांकडून प्राप्त झाल्याने     पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. या अपघाताची आर्वी पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.घरातील कर्तबगार मुलासह आईचाही मृत्यू झाल्याने गावकरी हळहळलेपुलगाव नजीकच्या इंझाळा येथील रहिवासी असलेल्या महेंद्र बाबाराव महाजन-सरडे व त्याची आई प्रेमिला बाबाराव महाजन-सरडे यांचा अपघातात मृत्यू झाल्याची वार्ता गावात पोहोचताच शोककळा पसरली. त्यांच्यासोबतची नयनाही जखमी असल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. महाजन-सरडे परिवार हा वारकरी संप्रदायाचा असून कष्टकरी आहेत. या विभक्त कुटूंब पद्धतीच्या काळातही महाजन-सरडे परिवार एकत्र कुटूंब पद्धतीत जीवन जगत होता. दोन भाऊ, स्नुषा, आई-वडील व नातवंड असा परिवार गुण्यागोविंदाने नांदत होता. महिंद्रा दिवसभर शेतात राबून भाजीपाला पिकविणे आणि पुलगाव बाजारात विकण्याचे काम करीत होता. त्यामुळे कुटूंबाची जबाबदारी पेलण्यात महिंद्राचा सिंहाचा वाटा होता. आज महाशिवरात्रीनिमित्त महिंद्राने गावातील मंदिरात दर्शन घेऊन बोरगाव (हातला) या गावाकडे रवाना झाला होता. पण, तेथे पोहोचण्यापूर्वीच अपघाताची बातमी धडकली. यात माय-लेकांचा जागीच मृत्यू झाल्याने परिवारावर मोठे संकट ओढवले आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू