शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

सव्वालाख विद्यार्थ्यांचे ‘लर्न फॉर्म होम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST

इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विविध विषयांच्या जवळपास १८६ प्रश्नपत्रिका या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याला १ लाख ७५ हजार ७६० विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या असून १ लाख २५ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिका सोडविल्या आहेत. आठही तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीतही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अध्यापन सुरु आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांसह पालकांचाही प्रतिसाद : पावणेदोन लाख विद्यार्थ्यांची संकेतस्थळाला भेट

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनच्या काळात सर्व शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. अभ्यासातील सातत्य कायम राहावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ‘लर्न फॉर्म होम’ हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला जिल्हा परिषदसह खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत तब्बल १ लाख २५ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रश्न पत्रिका सोडवून ‘लर्न फॉर्म होम’ या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.राज्यभरातील शाळा आता नव्या आदेशानुसार ३ मे पर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील सातत्य कायम राहावे, यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘लर्न फार्म होम’ ही संकल्पना मांडली. त्यानुसार जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या सूचनेनुसार शिक्षण विभागामार्फत ‘लर्न फॉर्म होम’ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले स्टडी मटेरियल  संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे.इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विविध विषयांच्या जवळपास १८६ प्रश्नपत्रिका या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याला १ लाख ७५ हजार ७६० विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या असून १ लाख २५ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिका सोडविल्या आहेत. आठही तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीतही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अध्यापन सुरु आहे.याकरिता सर्व गटविकास अधिकारी, केंद्र प्रमुख, मु्ख्यध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पालक यांचेही चांगले सहकार्य मिळत आहे.जिल्ह्याबाहेरील अडीच हजार विद्यार्थ्यांचा सहभागलॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. विध्यार्थी स्वत:च्या घरी बसून अभ्यास करावा, याकरिता शैक्षणिक हित जोपासत शिक्षण विभागाकडून ‘लर्न फॉर्म होम’ हा नवीन उपक्रम सुरु करण्यात आला. पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांच्या सारख्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. याकरिता तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रात पहिल्यांदा जिल्हास्तरावरून विशेष कृती गट स्थापन करण्यात आले.या ऑनलाईन उपक्रमामध्ये दररोज किती विद्यार्थी व शिक्षक सहभागी होतात हेही दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थी किंवा पालकांना काही अडचणी आल्यास ते शिक्षकांना विचारतात. शिक्षकही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे निराकरण करीत आहे. यामध्ये विषयानुसार प्रश्नपत्रिकेसह सामान्य ज्ञान, स्वयंअध्ययन व इतर उपक्रमही दिलेले असल्याने विद्यार्थींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.परिणामी जिल्ह्याबाहेरीलही जवळपास दोन ते अडीच विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.लॉकडाऊनच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच शिक्षणातील सातत्य कायम राहावे म्हणून ‘लर्न फॉर्म होम’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. याला विद्यार्थी व पालकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून विद्यार्थी व पालकांना असलेल्या अडचणींचे शिक्षकांकडून निराकरणही केले जात आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता नीट व सीईटी परीक्षेच्या दृष्टीकोनातूनही विद्यार्थ्यांकरिता अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला जाईल.- उल्हास नरड, शिक्षणाधिकारी, (माध्य.) वर्धा.

टॅग्स :Studentविद्यार्थी