शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

नो ड्यूसाठी शेतकर्‍यांना नाहक त्रास

By admin | Updated: May 31, 2014 00:08 IST

सध्या खरीप हंगामाची शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. शेतात पिकाच्या तयारीसाठी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी कर्जाची गरज असल्याने शेतकरी बँकेचे उंबरठे झीजवत आहे. परंतु तेथे नोड्यूसाठी त्यांना

वायगाव (नि.) : सध्या खरीप हंगामाची शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. शेतात पिकाच्या तयारीसाठी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी कर्जाची गरज असल्याने शेतकरी बँकेचे उंबरठे झीजवत आहे. परंतु तेथे नोड्यूसाठी त्यांना सतावले जात असल्याने वायगाव(नि.) येथील शेतकरी संतापले आहे. गेल्या वर्षापासून निसर्गाचा कोप असल्याने हातचे पीक वाया जात आहे. त्यातच या वर्षी खरीप हंगामात अतवृष्टी झाली तर रब्बी पिकाचे पीक घरी आणण्याच्या वेळेवरच गारपीट व वादळाने तडाखा दिला. त्यात तोंडाचा घास शेतकर्‍यांचा निसर्गाने हिरावून घेतला. आता खरीप हंगामाच्या बी-बियाणे व खतासाठी बँकेच्या कर्जाच्या आशेवर शेतकरी असताना नोड्यूसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेने शेतकर्‍यांना नोड्यू साठी गेल्यावर आल्या पावली परत पाठवण्याचा धंदा लावल्याचे चित्र दिसत आहे.   शेतकर्‍यांना नोड्यू न दिल्याने शेतकर्‍यांना वनवन भटकावे लागत आहे. शेतकर्‍यांनी नोड्यूसाठी आल्या पावली परत पाठवल्याने शासकीय बँक नोड्यू न आणल्यास कर्ज देण्यास तयार नसल्याने शेतकरी संभ्रमात आले आहे. यात वायगाव येथील सरपंच गणेश वांदाडे, ग्रा. पं. सदस्य सुनील तळवेकर, यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकार्‍यांना धारेवर धरून कार्याची जाणीव करून दिली. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी बेलखेडे यांना फोन करून या शेतकर्‍यांच्या अडचणीची जाणीव करून दिली. त्यात बेलखेडे यांनी वायगाव (नि.) शाखा व कानगाव शाखेच्या अधिकार्‍यांना कर्ज नसलेल्या शेतकर्‍यांना नोड्यू देण्याचे आदेश दिले व असे पुन्हा होणार नसल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले आहे.(वार्ताहर)