शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाच्या कामांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:01 IST

कोरोना संकटात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शौचालय निर्मितीच्या कामाला सध्या ब्रेक लागला आहे. इतकेच नव्हे तर ज्या व्यक्तीने शौचालयाचे काम पूर्ण केले त्या लाभार्थ्यांच्या झालेल्या कामाचे छायाचित्रही अपलोड करण्याचे काम सध्या थांबले आहे. त्यामुळे अनेक गरजुंना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणीत येत आहेत.

ठळक मुद्देकोरोना संकटाचा परिणाम : छायाचित्र अपलोडिंगचे काम थांबले

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हागणदारीमुक्त वर्धा या हेतूने जिल्ह्यातील गावागावात शौचालय बांधकामाचा विषय जि.प.च्या स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण)च्यावतीने हाती घेण्यात आला. परंतु, कोरोना संकटात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शौचालय निर्मितीच्या कामाला सध्या ब्रेक लागला आहे. इतकेच नव्हे तर ज्या व्यक्तीने शौचालयाचे काम पूर्ण केले त्या लाभार्थ्यांच्या झालेल्या कामाचे छायाचित्रही अपलोड करण्याचे काम सध्या थांबले आहे. त्यामुळे अनेक गरजुंना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणीत येत आहेत.प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०१२ पूर्वी १ लाख ९२ हजार ८०४ कुटुंब होते. त्यावेळी झालेल्या सर्वेक्षणात या कुटुंबापैकी १ लाख १ हजार २५७ कुटुंबांकडे शौचालय असल्याचे पुढे आले. त्यानंतर हागणदारीमुक्त वर्धा या हेतूने उर्वरित प्रत्येक घरी शौचालय बांधणाऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देत शौचालय निर्मितीवर भर देण्यात आला. ३१ जानेवारी २०१७ पर्यंत जिल्ह्यात एकूण ९१ हजार ५४७ शौचालय बांधण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील याच कामाची दखल घेत केंद्र व राज्य शासनाकडून वर्धा जिल्ह्याला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिवाय त्यानंतर झालेल्या दोन सर्वेक्षणात एकूण २० हजार ९३२ कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे पुढे आले. परिणामी हेच उद्दीष्ट वर्धा जिल्ह्याला मिळाले. शासनाकडून २० हजार ९३२ शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट मिळाल्यानंतर जि.प.च्या स्वच्छता मिशन (ग्रामीण)कडून प्रत्यक्ष कामालाही सुरूवात करण्यात आली. शिवाय त्यापैकी १२ हजार ३९२ शौचालय बांधण्यात आले. परंतु, कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्य व केंद्र सरकारकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याच लॉकडाऊनमुळे सध्या ८ हजार ५४० शौचालय बांधकामाला ब्रेक लागला आहे.१२ हजारांचे मिळतेय प्रोत्साहनपर बक्षीसहागणदारीमुक्त गाव या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन घराच्या आवारात शौचालय बांधणाºया व्यक्तींना शासनाकडून प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून १२ हजार रुपये दिले जाते. असे असले तरी अनेकांनी शौचालयाचे काम पूर्ण करूनही त्यांच्या कामाचे छायाचित्रत अपलोड न झाल्याने ते या शासकीय योजनेपासून सध्या वंचित आहेत.गुंडे, गुल्हाणेंच्या काळात उत्कृष्ट कामवर्धा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून सध्या डॉ. सचिन ओम्बासे कार्यरत आहेत. परंतु, त्यांच्यापूर्वी वर्धा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून नयना गुंडे आणि अजय गुल्हाणे यांनी सेवा दिली आहे. याच दोन अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात वर्धा जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य झाल्याने शासनानेही त्याची दखल घेत वर्धा जिल्ह्याला पुरस्कार देऊन गौरविले होते. 

टॅग्स :Socialसामाजिक