शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 12:30 IST

आपल्या लेकींचे लग्न आपल्या डोळ्यादेखत व्हावे अशी इच्छा मरणाच्या दारात टेकलेल्या वडिलांची होती.

मुलगी आणि वडिलांचे नाते काहीसे वेगळेच असते. आपल्या लेकींचे लग्न आपल्या डोळ्यादेखत व्हावे अशी इच्छा मरणाच्या दारात टेकलेल्या वडिलांची होती. आयसीयूमध्ये दाखल असलेल्या या व्यक्तीच्या मुलींच्या लग्नासाठी रुग्णालयात परवानगी मागितली असता, रुग्णालय व्यवस्थापनानेही नकार दिला नाही. मग  त्यांच्या दोन्ही मुलींचे आयसीयूमध्ये दाखल असलेल्या वडिलांसमोर आयसीयू वॉर्डमध्ये लग्न झाले. डॉक्टर आणि परिचारिका सगळेच या खास क्षणाचे साक्षीदार झाले. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले.

मोहम्मद इक्बाल हे आजाराने ग्रस्त असल्याने आयसीयूमध्ये आहेत. त्यांच्या दोन मुली आहेत, ज्यांच्या लग्नाची तारीख आधीच ठरलेली होती. पण, इक्बाल यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. वडील आजारी असल्याने ते लग्नाला उपस्थित राहू शकत नाहीत असे डॉक्टरांनी सांगितले. मग वडिलांच्या अनुपस्थित लग्न करण्यास दोन्ही मुलींनी नकार दिला. पण, त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाकडे मुलींचे लग्न आयसीसी वॉर्डमध्ये करण्यासाठी परवानगी मागितली. 

'बाप' माणसासमोर विवाहसोहळा  दरम्यान, इक्बाल यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांशी चर्चा केली असता मार्ग निघाला. डॉक्टरांनीही माणुसकीचे उदाहरण ठेवत लग्नासाठी परवानगी दिली. परवानगी मिळताच वधू वरांना रूग्णालयात आणून इक्बाल यांच्यासमोर विवाहसोहळा पार पडला. इरा मेडिकल कॉलेजच्या आयसीयू वॉर्डमध्ये वडिलांसमोर दोन्ही मुली विवाहबंधनात अडकल्या. दोन्ही लेकींचे लग्न डोळ्यासमोर होत असल्याचे पाहून ५१ वर्षीय इक्बाल यांना आनंदाश्रू आले. 

दोन्ही लग्न पार पडताच इक्बाल यांच्या कुटुंबीयांनी रूग्णालय प्रशासनाचे आभार मानले. इक्बाल यांच्यावर अजूनही आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंतानजनक असली तरी त्यांना आपल्या दोन मुलींच्या लग्नाला उपस्थित राहता आले याचा आनंद आहे. या अनोख्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. अनेकांनी या रूग्णालय प्रशासनाचे कौतुक केले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSocial Viralसोशल व्हायरलmarriageलग्नhospitalहॉस्पिटल