महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून कार्य करावे, हीच आमची अपेक्षा होती, अशी प्रतिक्रिया महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर व्यक्त करीत त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. ...
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणे दिसत नसली तरी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार मी स्वत:ला होम आयसोलेट करून घेतले आहे. ...
नागपूरमध्ये कोविडचा प्रादुर्भाव दररोज वाढत असून मृत्यूसंख्या ५०० च्या घरात पोहचली आहे. मनपा प्रशासनाकडून रुग्णांसाठी व्यवस्था असल्याचा दावा केला जात आहे. तर कोविड रुग्णांसाठी खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाहीत, कोविड केअर सेंटरमध्ये प ...