आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 06:58 IST2026-04-20T06:57:49+5:302026-04-20T06:58:46+5:30
Today Daily Horoscope 20 April: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
मेष: आजचा दिवस खर्चाचा असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक देवाण- घेवाण करताना सावध राहावे लागेल. कोणाशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आप्तेष्टांशी मतभेद होण्याची व आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. एकंदरीत आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आणखी वाचा
वृषभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. रचनात्मक व कलात्मक क्षमता वाढेल. मानसिकदृष्टया वैचारिक स्थिरता येईल. मन लावून काम कराल. आर्थिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. आर्थिक आयोजन कराल. अलंकार, सौंदर्य प्रसाधने व मनोरंजन ह्यावर खर्च कराल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवाल. आत्मविश्वास वाढेल. आणखी वाचा
मिथुन: आज आपले संयमशील व विचारपूर्ण वर्तन अनेक अनिष्ट गोष्टींपासून बचाव करू शकेल. आपल्या वक्तव्याने गैरसमज निर्माण होतील. शारीरिक कष्ट मनाला अस्वस्थ बनवतील. कौटुंबिक वातावरण गढूळ राहील. खर्च जास्त होईल. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करावे लागतील. आणखी वाचा
कर्क: आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मित्रांशी चर्चा झाल्याचा आनंद होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. रमणीय स्थळी सहलीचे बेत आखाल. पत्नी व संतती कडून सौख्य लाभेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. आणखी वाचा
सिंह: खंबीर मन व दृढ निश्चय ह्यामुळे प्रत्येक कार्यात सुयश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. बढतीची शक्यता आहे. पैतृक संपत्ती पासून लाभ होईल. कला व क्रीडा क्षेत्रांतील व्यक्तींना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. धनाच्या दृष्टीने सरकारी कामे सफल होतील. घराचा कागदोपत्री व्यवहार करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे, आणखी वाचा
कन्या: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धर्मिक कार्य व प्रवासास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्र व संबंधीतांशी होणार्या चर्चेमुळे आनंद होईल. विदेशातील स्नेह्यांकडून आनंददायी बातमी मिळेल. भावंडांमुळे आर्थिक फायदा होईल. आणखी वाचा
तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी असल्याने नवे कार्य हाती घेऊन त्यात यशस्वी होऊ शकाल. वक्तृत्व व कृती संयमित ठेवणे हितावह राहील. द्वेषापासून दूर राहा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. रहस्यमय व गूढविद्येकडे आकर्षित व्हाल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. मनाला शांती मिळण्यासाठी प्रयत्नशील राहा. आणखी वाचा
वृश्चिक: आजचा दिवस काहीसा वेगळाच आहे. स्वतःसाठी वेळ काढू शकाल. मित्रांसह प्रवास, मौज - मजा, मनोरंजन व एखाद्या सहलीस जाऊन तसेच रुचकर भोजन, वस्त्रालंकार इत्यादींमुळे खूप आनंदी राहाल. मान - सन्मानात वाढ होऊन एखादा सत्कार होण्याची शक्यता आहे. वाहनसौख्य मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्याने मन प्रफुल्लित होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आणखी वाचा
धनु: आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत लाभ व सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कार्यात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. एखादी चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. वाणीवर संयम ठेवावा लागेल. मित्र - मैत्रिणींचा सहवास घडेल. आणखी वाचा
मकर: आज आपले मन चिंतातुर व द्विधा अवस्थेत राहील. अशा मनःस्थितीत आपण कोणत्याही कामात खंबीर पणे निर्णय घेऊ शकणार नाही. नशिबाची साथ नसल्याने आज कोणतेही महत्वाचे काम न करणे हितावह राहील. संततीच्या आरोग्याची काळजी राहील. कार्यालयात वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. अनावश्यक खर्च होतील. संततीशी मतभेद संभवतात. आणखी वाचा
कुंभ: आज मानसिक तणावामुळे ग्रासून जाल. मनात एखादी आर्थिक योजना आखाल. स्त्रीयांचे अलंकार, वस्त्र, सौंदर्य प्रसाधने ह्यावर पैसा खर्च होईल. लाभाची शक्यता आहे. जमीन, घर व वाहन इत्यादींचे व्यवहार काळजी पूर्वक करावेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूलता लाभेल. कोणत्याही गोष्टीत हट्टीपणा करू नका. आणखी वाचा
मीन: आजचा दिवस महत्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. सृजनात्मक व कलात्मक शक्ती वाढेल. मित्र व कुटुंबियांसह एखाद्या प्रवासाला जाल. भावंडांकडून फायदा होईल. कामाचे यश आपले मन आनंदी करेल. सार्वजनिक जीवनात मान-सन्मान होतील. आपल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकाल. आणखी वाचा
