Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 06:26 IST2026-04-20T06:24:58+5:302026-04-20T06:26:16+5:30

Maharashtra Heatwave: रविवारी देशातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमान अकोला व वर्धा शहरात नोंदविले गेले. 

Heatwave: Akola, Wardha are the hottest in the country, while Sangli is experiencing heavy rain with hail! | Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!

Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/अकोला : पुढील तीन दिवस राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला असतानाच रविवारी महाराष्ट्रात उष्मा वाढला होता. तर सांगली जिल्ह्यात गारांचा पाऊस पडला. 

रविवारी देशातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमान अकोला व वर्धा शहरात नोंदविले गेले. विदर्भातील सर्वच शहरांचा पारा ४१ अंशांवर गेला असून, नागपूर, अमरावती शहरांचे तापमानही ४४ अंशापेक्षा जास्त नोंदविण्यात आले. रविवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने मिरज, तासगाव तालुक्यासह सांगली, मिरज आणि कुपवाड या शहरांना झोडपून काढले. 

भारतातील टॉप ५ सर्वाधिक उष्ण शहरे (एप्रिल २०२६)

क्रमांकशहरराज्यतापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अकोलामहाराष्ट्र४५.०°C
वर्धामहाराष्ट्र४५.०°C
प्रयागराजउत्तर प्रदेश४४.६०°C
राजनांदगावछत्तीसगड४४.५०°C
नागपूरमहाराष्ट्र४४.४०°C

मराठवाडा ४० अंशांवर

विदर्भासह मराठवाड्यातील सर्व प्रमुख शहरांचेही तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील  जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातील  पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या शहरांचे तापमान ४० ते ४३ अंशांपर्यंत गेले आहे. विदर्भात पुढच्या दोन दिवसांसाठी हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. \\

विदर्भातील शहरांचे तापमान (ताज्या नोंदीनुसार)

शहरतापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अमरावती४४.२०°C
गोंदिया४३.५०°C
यवतमाळ४३.२०°C
ब्रह्मपुरी४३.२०°C
गडचिरोली४३.२०°C

कोकणात ढगाळ वातावरण अवकाळीची शक्यता कमी

विदर्भ, खान्देशच्या तुलनेत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पावसाचे प्रमाण अधिक असेल. कोकणात अवकाळी पावसाची शक्यता कमी आहे. तिथे ढगाळ हवामान राहील. सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. 

Web Title : भीषण गर्मी: अकोला, वर्धा सबसे गर्म; सांगली में ओलावृष्टि!

Web Summary : अकोला और वर्धा में 45 डिग्री सेल्सियस तापमान दर्ज, विदर्भ में लू, मराठवाड़ा 40 डिग्री सेल्सियस तक। सांगली में ओलावृष्टि। विदर्भ के लिए बारिश का अलर्ट।

Web Title : Heatwave grips India: Akola, Wardha hottest; Sangli sees hailstorm.

Web Summary : Akola and Wardha recorded 45°C, India's highest. Vidarbha faces heatwave, Marathwada hits 40°C. Sangli experienced hailstorms. Rain alert issued for Vidarbha.