नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 07:37 IST2026-04-20T07:35:38+5:302026-04-20T07:37:44+5:30

काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार शनिवारी घडला.

Kalyan: Row Over Breakfast; Congress Corporator Kanchan Kulkarni Slaps District President Rajabhau Patkar | नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!

नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार शनिवारी घडला. कल्याण पूर्वेकडील कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या नाश्त्यावरून हा वाद झाला होता. त्यास कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला.

 संघटन सृजन अभियानांतर्गत बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी नाश्त्यावरून कुलकर्णी यांना पातकर यांनी शिवीगाळ केली. तेव्हा कुलकर्णी तेथे नव्हत्या, मात्र महिला कार्यकर्त्यांनी हा प्रकार कुलकर्णी यांना सांगितला. त्यानंतर पातकर यांना जाब विचारला; परंतु त्यांनी उद्धट उत्तर दिल्याने कुलकर्णी यांनी त्यांच्या कानशिलात लगावल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. 

पातकर यांनी अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या. ही बाब मला महिला कार्यकर्त्यांनी सांगितली. याबाबत मी त्यांना विचारणा केली असता त्यांनी कार्यकर्त्यांसमोर पुन्हा उद्धट भाषा वापरली.  त्यामुळे मी त्यांच्या कानशिलात लगावली. मला याबाबत कोणतीही खंत नाही. कांचन कुलकर्णी,  नगरसेविका, काँग्रेस

बदनामीचा आरोप 

कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना वाद घडल्याच्या प्रकाराला दुजोरा दिला. पातकर यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचे सांगितले. तर, थोडा वाद झाला, बाचाबाची झाली, असे पातकर म्हणाले. विरोधक माझी नाहक बदनामी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Web Title : नाश्ते पर विवाद: पार्षद ने कार्यकर्ताओं के सामने जिलाध्यक्ष को थप्पड़ मारा!

Web Summary : कल्याण में कांग्रेस पार्षद कांचन कुलकर्णी ने नाश्ते के विवाद में जिलाध्यक्ष राजाभाऊ पातकर को थप्पड़ मार दिया। कुलकर्णी ने घटना की पुष्टि करते हुए कहा कि पातकर ने उनके और अन्य महिला कार्यकर्ताओं के प्रति अपमानजनक भाषा का प्रयोग किया। पातकर ने मामूली बहस स्वीकार की और विरोधियों पर मानहानि का आरोप लगाया।

Web Title : Corporator Slaps District President Over Breakfast Dispute Before Party Workers!

Web Summary : Congress corporator Kanchan Kulkarni slapped district president Rajabhau Patkar over a breakfast dispute during a party event in Kalyan. Kulkarni confirmed the incident, stating Patkar used abusive language towards her and other women workers. Patkar admitted to a minor argument and accused opponents of defamation.