श्रीगोंदा तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री जर मोठ्या प्रमाणात निधी देत आहेत. तर मग त्यांच्याविरोधात डल्ला मारणारांचे हल्लाबोलचे नाटक कशासाठी? असा टोला माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी मारला आहे. ...
श्रीगोंद्यात विजमंडळाच्या उपभियंत्याला मिठाईचे पैसे मागितल्याचा राग धरून मिठाई दुकानदाराच्या दुकानाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे या मिठाई मालकाचे ७० हजाराचे नुकसान झाले आहे, अशी तक्रार तुलसीदास चौधरी यांनी श्रीगोंदा पोलिसांकडे दाखल केली आहे. ...
संपत्तीसाठी मोठ्या भावानेच चिमुकल्या भावाचा खून केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली. याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण येथील भाऊ, भावजय व सासूला पोलीसांनी गुरुवारी (८ जानेवारी) अटक केली आहे. ...
नगर-पुणे रोडवरील गव्हाणेवाडी (ता़ श्रीगोंदा) येथे क्रिकेट सामन्यात नो बॉल टाकला म्हणून मंगळवारी दुपारी काळे व गव्हाणे गटात मारामारी झाली. त्यानंतर काही वेळातच गोळीबार करण्यात आला. ...
तालुक्यातील घारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्या पावसाळ््यात कोसळल्या. त्यानंतर प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने आजही विद्यार्थ्यांना धोकादायक वर्गखोल्यात धडे गिरवावे लागत आहे. ...
‘दंडवतेजी, आपकी कला बहुत सुंदर और रचनात्मक है।’ असे कौतुकोद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर येथील प्रसिद्ध कलाकार हेमंत दंडवते यांची गळाभेट घेतली. ...
सोनाली कोकाटे ही काष्टी येथील रहिवासी. तिचे वडील, चुलते, आत्या हे सर्व किडनी आजाराच्या शिकार झाले. या किडनीच्या आजाराने सर्व कुटुंबालाच गिळले असताना आता मागे राहिलेल्या सोनाली कोकाटे हिलाही या आजाराने विळखा घातला आहे. ...
गुजरात राज्यात भाजपाची घसरगुंडी झाल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते, आमदार दिलीप वळसे यांनी केले. ...