साताऱ्यासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने थंडीचे प्रमाण कमी झाले. त्यात शुक्रवारी रात्रीपासून पारा अचानक घसरला. शनिवारी सकाळी पारा सरासरी सोळा अंशावर घसरला होता. कडाक्याच्या थंडीमुळे सातारकर गारठले आहेत. महामार्गावर दाट धुके पड ...
शाळेत निघालेल्या दोन विद्यार्थ्यांना रिक्षाची धडक बसल्याने दोघेही विद्यार्थी जखमी झाले. या अपघातानंतर लोक मारहाण करतील, या भीतीपोटी रिक्षाचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास येथील सातारा जिल्हा परिषद परिसरात ...
बजने दे थडक-थडक ढोल-ताशा धडक-धडक भंडारा छिडक-छिडक मल्हारी... या गाण्यावर तालबद्ध नृत्य करून मतिमंद मुलांनी सातारकरांचे लक्ष वेधले. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा नाका म्हणून ओळख असणारा पोवई नाका सकाळी यामुळे काही वेळासाठी थबकला. आशा भवनच्या विद्यार्थ्यांच ...
पिढ्यान्पिढ्या दुष्काळी तालुका म्हणून परिचित असणारा व विकासापासून आजवर दुर्लक्षित असलेल्या माण तालुक्यातून पाच महामार्गांची कामे सुरू झाल्याने दळणवळणाची मोठी सोय होणार आहे. अनेक मोठी शहरे दुष्काळी भागाशी जोडली जाणार असल्याने पुढील काळात या भागाच्या व ...
सैनिकांचा जिल्हा म्हणून साताऱ्याला ओळखले जाते. येथील प्रत्येक गावातील प्रत्येक तरुण देशसेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहतो. सैन्यभरतीस शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यातून तरुण दाखल झाले आहेत. ...
सातारकर नागरिकांना ट्रॅफिकजामचा फारसा अनुभवच नसतो. इनमिन तीन रस्ते अन् वाहनेही कमी. त्यामुळे काही मिनिटांत इच्छित ठिकाणी पोहोचले जाते; पण अलीकडे मालवाहू ट्रक रहदारीच्या ठिकाणी कित्येक तास थांबत असल्याने नवीनच समस्या उद्भवू लागल्या आहेत. दोन मिनिटांच् ...
सातारा येथील अजिंक्यताऱ्यावर लुटमारीचे व हुल्लडबाजीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी दोन पथके स्थापन केली असून, ही पथके दुपारी आणि सायंकाळी या ठिकाणी गस्त घालणार आहेत. अजिंक्यताऱ्यावर काही दिवसांपूर्वी भल्या मोठ्या दगडावरून सेल्फी काढताना युवक पडून गंभ ...
कातरखटाव-वडूज या नऊ किलोमीटर अंतरातील खड्डे भरण्याचे काम गत दोन दिवसांपासून सुरू असतानाच मार्गावरील कुंभारमळवी पुलावरून सार्वजनिक बांधकाम खात्याचा खडीने भरलेला डंपर ओढ्यात कोसळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संभाव्य धोका टळलेला नाही. हा प ...