Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?

PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?

PM Narendra Modi UAE Visit : अबूधाबीमध्ये पंतप्रधान केवळ दोन तासच होते. मात्र, या दोनच तासांत त्यांनी तब्बल ४,७९,६२,०७,५०,००० रुपयांचा अर्थात ५ अब्ज डॉलर्सचा मोठा करार केला. या कराराने भारताच्या तेल आणि ऊर्जा संकटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 23:09 IST2026-05-15T23:03:41+5:302026-05-15T23:09:42+5:30

PM Narendra Modi UAE Visit : अबूधाबीमध्ये पंतप्रधान केवळ दोन तासच होते. मात्र, या दोनच तासांत त्यांनी तब्बल ४,७९,६२,०७,५०,००० रुपयांचा अर्थात ५ अब्ज डॉलर्सचा मोठा करार केला. या कराराने भारताच्या तेल आणि ऊर्जा संकटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

PM Narendra Modi 2-hour power visit Deal worth 479620750000 made with UAE Will India's oil-gas crisis end forever | PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?

PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच देशांच्या दौऱ्यातील पहिला टप्पा होता संयुक्त अरब अमिरातीची (UAE) भेट. पंतप्रधान मोदींची ही भेट भारतासाठी 'गेम चेंजर' ठरली आहे. अबूधाबीमध्ये पंतप्रधान केवळ दोन तासच होते. मात्र, या दोनच तासांत त्यांनी तब्बल ४,७९,६२,०७,५०,००० रुपयांचा अर्थात ५ अब्ज डॉलर्सचा मोठा करार केला. या कराराने भारताच्या तेल आणि ऊर्जा संकटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्वात मोठा आणि ऐतिहासिक करार -
या भेटीत सर्वात मोठा आणि ऐतिहासिक करार झाला तो, भारताच्या 'स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह' (SPR) संदर्भात. या करारानुसार, आता UAE भारताच्या धोरणात्मक तेल साठ्यात तब्बल ३० दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची साठवणूक करेल. या करारासंदर्भात माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, "हा देशासाठी एक ऐतिहासिक करार आहे." इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेड आणि अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी यांच्यात एक करार झाला आहे, याअंतर्गत संयुक्त अरब अमिरात (UAE) भारताच्या SPR साठ्यामधील आपला हिस्सा ३० दशलक्ष बॅरलपर्यंत वाढवणार आहे.

याशिवाय, UAE भारतात एक सामरिक गॅस साठाही उभारण्यातही सहकार्य करेल. या करारामुळे UAE च्या तेलाचा मोठा साठा भारतीय भूमीवर नेहमी उपलब्ध राहील. हा साठा कठीण काळात भारताला काही महिन्यांपर्यंत पूरेल एवढा असेल. महत्वाचे म्हणजे, स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह (SPR) हा कच्च्या तेलाचा एक आपत्कालीन साठा आहे, जो कोणताही देश युद्ध, नैसर्गिक आपत्ती किंवा जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय आल्यास वापरत असतो.

५ अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक -
पंतप्रधानांच्या या 'पावर व्हिजिट'मध्ये, संरक्षण, एलपीजी पुरवठा आणि तेल साठवणूक यांसारख्या क्षेत्रांत एकूण ५ अब्ज डॉलर्सच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. यानुसार एमिरेट्स एनबीडी (Emirates NBD) भारताच्या आरबीएल (RBL) बँकेत ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. अबू धाबी गुंतवणूक प्राधिकरण भारताच्या 'नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर'मध्ये १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल, तसेच इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीमध्ये १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्या येणार आहे. 

 

Web Title : पीएम मोदी की यूएई यात्रा: 5 अरब डॉलर का सौदा, भारत की ऊर्जा सुरक्षा मजबूत

Web Summary : पीएम मोदी की यूएई यात्रा के दौरान 5 अरब डॉलर का सौदा हुआ, जिससे भारत के रणनीतिक पेट्रोलियम भंडार को बढ़ावा मिलेगा। यूएई भारत में 30 मिलियन बैरल कच्चे तेल का भंडारण करेगा। निवेश में एमिरेट्स एनबीडी द्वारा आरबीएल बैंक में 3 अरब डॉलर और बुनियादी ढांचे और होल्डिंग्स में 2 अरब डॉलर का निवेश शामिल है, जिससे ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित होगी।

Web Title : PM Modi's UAE Visit: $5 Billion Deal Secures India's Energy Future

Web Summary : PM Modi's whirlwind UAE visit secured a $5 billion deal, bolstering India's strategic petroleum reserves. The UAE will store 30 million barrels of crude oil in India. Investments include Emirates NBD investing $3 billion in RBL Bank, and $2 billion in infrastructure and holdings, ensuring energy security.