भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
म्हादईच्या प्रश्नावर गोवा व कर्नाटक यांच्यात वाद चालू असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कर्नाटकात भाजपचेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असे विधान केले आहे. ...
भाजप सरकारकडे म्हादईबाबत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे नाहीत. कर्नाटकची निवडणूक होईपर्यंत वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे, अशी टीका विजय सरदेसाईंनी केली. ...