पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 09:44 IST2026-04-28T09:43:50+5:302026-04-28T09:44:33+5:30
Blast In Punjab: पंजाबमधील पतियाळा येथे सोमवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे शंभू अंबाला रेल्वे ट्रॅकजवळ एक मोठा स्फोट झाला. यात रेल्वे ट्रॅकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, स्फोट झालेल्या ठिकाणावर एका इसमाचा मृतदेहही सापडला आहे.

पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
पंजाबमधील पतियाळा येथे सोमवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे शंभू अंबाला रेल्वे ट्रॅकजवळ एक मोठा स्फोट झाला. यात रेल्वे ट्रॅकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, स्फोट झालेल्या ठिकाणावर एका इसमाचा मृतदेहही सापडला आहे.
हा स्फोट सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मालगाड्यांसाठी आरक्षित असलेल्या मार्गावर झाला. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, डीआयजी आणि पतियाळाचे एसएसपी वरुण शर्मा हे घटनास्थळी पोहोचले. त्यासोबतच जीआरपी, रेल्वे सुरक्षा दलाची पथकेही तपासासाठी घटनास्थळावर दाखल झाली आहेत.
पतियाळाचे एसएसपी वरुण शर्मा यांनी सांगितले की, स्फोटामुळे रेल्वे ट्रॅकचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. हा एक कमी तीव्रतेचा स्फोट होता. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, हा स्फोट ज्या ठिकाणी झाला. त्या टिकाणावरून एका अज्ञात इसमाचा मृतदेहही ताब्यात घेण्यात आला आहे. मात्र या इसमाचा मृत्यू या स्फोटात झाला आहे की, त्याच्या मृत्यूमागे काही अन्य कारण आहे, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. हा मृतदेह आणि स्फोटामागे काही संबंध आहे का याचा शोध आता पोलीस घेत आहेत.