राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
विरोधकांना नाऊमेद करण्यासाठी ईडीचा एक साधन म्हणून वापर केला जातोय, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलाय. देशात संस्थांच्या गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम ईडी या संस्थेच्या माध्यमातून होत होते. मात्र मागच्या काही वर्षांप ...