ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 20:48 IST2026-05-14T20:44:42+5:302026-05-14T20:48:22+5:30

ही एसयूव्ही प्रामुख्यने भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत तयार केली जात आहे. ही कार २०२६ च्या अखेरीस अथवा २०२७ च्या सुरुवातीला बाजारात दाखल होऊ शकते. असे मानले जात आहे.

Hyundai will bring a cheap and cool electric SUV, what features will it have It will compete with these cars including Tata Punch EV | ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर

ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (EV) मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. यातच आता दिग्गज कार कंपनी ह्युंडाई (Hyundai) भारतीय बाजारात एक नवीन आणि स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही एसयूव्ही प्रामुख्यने भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत तयार केली जात आहे. ही कार २०२६ च्या अखेरीस अथवा २०२७ च्या सुरुवातीला बाजारात दाखल होऊ शकते. असे मानले जात आहे.

भारतात होणार मोठ्या प्रमाणावर उत्पादन - 
माध्यमांतील वृत्तांनुसार, ह्युंडाईच्या या नवीन इलेक्ट्रिक SUV चे कोडनेम 'HE1i' असे ठेवण्यात आले आहे. ही एक ४ मीटरपेक्षा कमी लांबीची कॉम्पॅक्ट SUV असेल. हीचा आकार टाटा पंच EV आणि महिंद्रा XUV 3XO EV सारख्या कारच्या तोडीस तोड असेल. विशेष म्हणजे, कंपनी या कारचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन भारतातच करणार असल्यचे समजते. तसेच, खर्च कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना किफायतशीर किंमत कारची चावी देण्यासाठी, कंपनी स्थानिक सुट्या भागांच्या (Local Parts) वापरावर अधिक भर देत आहे.

आधुनिक डिझाईन आणि तंत्रज्ञान -
या कारचे डिझाईन आधुनिक आणि बॉक्सी असू शकते. जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील 'ह्युंडाई इन्स्टर EV' प्रमाणे असू शकेल. यात स्प्लिट हेडलॅम्प, स्लिम LED DRLs आणि पिक्सेल-स्टाईल LED टेललाइट्स पाहायला मिळतील. एवढेच नाही तर, या कारला मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड सीट्स, इलेक्ट्रिक सनरूफ आणि लेव्हल-२ ADAS सारखे प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानही दिले जाण्याची शक्यता आहे.

सुरक्षा आणि रेंज -
सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता, या SUV चे बॉडी स्ट्रक्चरसह जबरदस्त असले. ही कार क्रॅश टेस्टमध्ये ५-स्टार रेटिंग मिळवण्यास सक्षम असेल. बॅटरीचा विचार केला तर यात ४२kWh आणि ४९kWh असे दोन पर्याय उपलब्ध असू शकतात. यामुळे कार एका चार्जमध्ये ३०० किलोमीटरपेक्षा अधिक ड्रायव्हिंग रेंज देण्यात सक्षम असेल. लहान मॉडेल रोजच्या शहरी वापरासाठी अधिक योग्य असेल, तर मोठे मॉडेल लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक उपयुक्त मानले जाते.

 

Web Title : हुंडई लाएगी सस्ती इलेक्ट्रिक एसयूवी, टाटा पंच ईवी को टक्कर

Web Summary : हुंडई 2026/27 तक भारत में किफायती इलेक्ट्रिक एसयूवी लॉन्च करने की योजना बना रही है, जिसका कोड नाम HE1i है। यह कॉम्पैक्ट एसयूवी, स्थानीय रूप से निर्मित, टाटा पंच ईवी के साथ प्रतिस्पर्धा करेगी, आधुनिक डिजाइन, उन्नत तकनीक और 300 किमी+ रेंज की पेशकश करेगी।

Web Title : Hyundai to Launch Affordable Electric SUV, Rivaling Tata Punch EV

Web Summary : Hyundai plans a budget-friendly electric SUV for India by 2026/27, codenamed HE1i. This compact SUV, locally produced, will compete with Tata Punch EV, offering modern design, advanced tech, and a 300km+ range.