Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 

सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 

महत्वाचे म्हणजे, सरकारने सोन्यावरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्के केल्यानंतर अवघ्या एका दिवसातच हा नवा निर्णय घेतला आहे. देशाचे विक्रमी आयात बिल कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 21:23 IST2026-05-14T21:22:31+5:302026-05-14T21:23:09+5:30

महत्वाचे म्हणजे, सरकारने सोन्यावरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्के केल्यानंतर अवघ्या एका दिवसातच हा नवा निर्णय घेतला आहे. देशाचे विक्रमी आयात बिल कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Another big decision of the government regarding gold, Prime Minister Narendra Modi had appealed to avoid buying it | सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 

सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सोन्याच्या आयातीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने ड्युटी-फ्री (करमुक्त) सोन्याच्या आयातीचे नियम आता अधिक कडक केले आहेत. यानुसार आता प्रति परवाना केवळ १०० किलो सोन्याचीच आयात मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. हे नवीन नियम तातडीने लागू करण्यात आले आहेत. 

महत्वाचे म्हणजे, सरकारने सोन्यावरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्के केल्यानंतर अवघ्या एका दिवसातच हा नवा निर्णय घेतला आहे. देशाचे विक्रमी आयात बिल कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीनी यांनी केलंय सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन - 
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा फटका संपूर्ण जगालाच बसत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, "सरकार पश्चिम आशियाई संकटाच्या प्रतिकूल परिणामांपासून लोकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत काही आवश्यक पावलेही उचलणे आवश्यक आहे. सध्याच्या संकटकाळात परकीय चलन वाचवण्यावर अधिक भर देणे आवश्यक आहे. त्यांनी देशवासीयांना परकीय चलन साठा जपण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

आपली देशभक्ती आपल्याला परकीय चलन वाचवण्याचे आव्हान देत आहे -
पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की, सोन्याच्या खरेदीसाठी देशाचे मोठे परकीय चलन खर्च होते. देशावर संकट किंवा युद्ध आल्यास लोक सोने दान करत. आज दान करण्याची आवश्यकता नाही. मात्र, देशहितासाठी आपण सर्वांनी मिळून एक संकल्प करणे गरजेचे आहे. कोणताही कौटुंबिक सोहळ्यात अथवा कार्यक्रमात सोन्याचे दागिने खरेदी करणे टाळण्याचा संकल्प नागरिकांनी करावा. आपली देशभक्ती आपल्याला परकीय चलन वाचवण्याचे आव्हान देत आहे. हे आव्हान स्वीकारून देशाचे चलन वाचवणे आवश्यक आहे. असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

एक वर्ष लग्नासाठी सोने खरेदी करू नका -
किमान एक वर्ष लग्नासाठी सोने खरेदी करू नका. सोन्याच्या आयातीमुळे आपला मोठा पैसा परदेशात जातो. तो पैसा वाचवून बँकांमध्ये जमा करा, जेणेकरून त्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी व गरिबांच्या कल्याणासाठी होईल, असे आवाहनही नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

Web Title : सोने के आयात नियमों को सरकार ने किया सख्त; पीएम मोदी ने खरीदी कम करने का आग्रह किया।

Web Summary : सोने के आयात को कम करने के लिए, सरकार ने शुल्क-मुक्त आयात को 100 किलोग्राम प्रति लाइसेंस तक सीमित कर दिया है। इसके बाद आयात शुल्क को बढ़ाकर 15% कर दिया गया है। पीएम मोदी नागरिकों से सोने की खरीद कम करने और राष्ट्रीय विकास के लिए बचत का निवेश करने का आग्रह करते हैं।

Web Title : Government Tightens Gold Import Rules; PM Modi Urges Purchase Restraint.

Web Summary : To curb gold imports, the government has limited duty-free imports to 100 kg per license. This follows a hike in import duty to 15%. PM Modi urges citizens to reduce gold purchases and invest savings for national development.