अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 20:31 IST2026-05-14T20:29:03+5:302026-05-14T20:31:13+5:30

India LPG tankers strait of Hormuz: भारतासह आशियाई देशांमधील ऊर्जा पुरवठ्याबाबतची चिंता कमी झाली

Good news for India amid US-Iran tensions 2 LPG tankers pass through strait of Hormuz and move on! | अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!

अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!

India LPG tankers strait of Hormuz: अमेरिका आणि इराण यांच्यातील सध्याचा तणाव आणि युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आखाती देशातून निघालेल्या LPG घेऊन जाणाऱ्या दोन मोठ्या जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली आहे. यामुळे भारतासह आशियाई देशांमधील ऊर्जा पुरवठ्याबाबतची चिंता कमी झाली असून साऱ्यांनाच दिलासा मिळाला आहे.

ट्रान्सपॉन्डर बंद करून केला प्रवास

मिळालेल्या वृत्तानुसार, 'सिमी' आणि 'एनव्ही सनशाईन' ही एलपीजी वाहक जहाजे गुरुवारी ओमानच्या आखातात दिसली. विशेष म्हणजे, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करताना दोन्ही जहाजांनी त्यांचे ट्रान्सपॉन्डर्स बंद केले होते. ट्रान्सपॉन्डर्स ही जहाजांद्वारे त्यांचे स्थान सांगण्यासाठी (Location) वापरली जाणारी एक प्रणाली आहे. जहाजाच्या ट्रॅकिंग डेटानुसार, 'एनव्ही सनशाईन'ने संयुक्त अरब अमिरातीमधील रुवाईस रिफायनरीमधून एलपीजी भरला आहे. सुरुवातीला, त्याचे डेस्टिनेशन मंगळुरू असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु आता ते पश्चिम भारतातील कांडला बंदराकडे जात असल्याचे समजते. दरम्यान, 'सिमी' हे जहाज कतारमधील रास लाफान येथून कांडलाकडे एलपीजी घेऊन जात आहे.

ऊर्जा पुरवठ्यात वाढ दिलासादायक

या दोन जहाजांमुळे, रविवारपासून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या मोठ्या तेल आणि वायू जहाजांची संख्या १० झाली आहे. यामध्ये इतर तीन एलपीजी जहाजे, चार मोठे कच्चे तेल टँकर आणि एक एलएनजी टँकर यांचा समावेश आहे. जरी या प्रदेशात तणाव कायम असला आणि युद्ध टाळण्यासाठी अमेरिका व इराण यांच्यातील चर्चेत अद्याप कोणतीही ठोस प्रगती झाली नसली तरी, अनेक आखाती निर्यातदारांना आपला पुरवठा कायम ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी (ADNOC) सह अनेक कंपन्या, आपले स्थान जाहीर न करणाऱ्या जहाजांमार्फत इंधन पाठवत आहेत, तर दुसरीकडे अमेरिकी नौदलदेखील त्या परिसरात सतत पाळत ठेवत आहे.

सुपरटँकर ओमानच्या आखातात अडकून पडला

व्हिएतनामला इराकी तेल घेऊन जाणारा 'अजिओस फानुरिओस १' हा सुपरटँकर सध्या ओमानच्या आखातात अडकून पडला आहे. अमेरिकेच्या नौदलाने त्याला परत पाठवल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अनेक चिनी आणि जपानी तेलवाहू जहाजेसुद्धा अमेरिकेच्या नाकेबंदी रेषेजवळ कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.

Web Title : भारत के लिए राहत: अमेरिका-ईरान तनाव के बीच एलपीजी टैंकर होर्मुज से निकले।

Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के बीच, भारत के लिए एलपीजी टैंकर होर्मुज जलडमरूमध्य को सुरक्षित रूप से पार कर गए, जिससे ऊर्जा आपूर्ति की चिंता कम हो गई। क्षेत्रीय अशांति और रुकी हुई अमेरिका-ईरान वार्ता के बावजूद, खाड़ी निर्यातक अघोषित जहाजों का उपयोग करके ईंधन आपूर्ति बनाए रखने का प्रयास कर रहे हैं, जिसकी अमेरिकी नौसेना द्वारा बारीकी से निगरानी की जा रही है।

Web Title : India relief: LPG tankers cross Hormuz amid US-Iran tensions.

Web Summary : Amid US-Iran tensions, two LPG tankers destined for India safely crossed the Strait of Hormuz, easing energy supply concerns. Despite regional unease and stalled US-Iran talks, Gulf exporters are striving to maintain fuel supplies using undisclosed vessels, closely monitored by the US Navy.