जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 20:18 IST2026-05-14T20:17:11+5:302026-05-14T20:18:16+5:30

महत्वाचे म्हणजे, एखादा टायर खराब झाला, तरीही ही कार चक्क तीन चाकांवरही धावू शकेल, असा दावा कंपनीने केला आहे.

Awesome It will run 1380 km and can run on three wheels! Will this new high-tech BYD Electric car bao-8-and-bao-5 take the auto world by storm | जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?

जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?

इलेक्ट्रिक कारच्या जगतात BYD सातत्याने नवनवीन आणि हायटेक वाहने सादर करत आहे. कंपनीने २०२६ फंगचेंगबाओ बाओ ५ आणि बाओ ८ चे फ्लॅश चार्जिंग अॅडिशन सादर करत आपल्या प्रगत इंजिनिअरिंगची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. या नव्या इलेक्ट्रिक SUV ची केवळ तिच्या लक्झरी फीचर्ससाठीच नव्हे, तर तिच्या अद्भूत ड्रायव्हिंग क्षमतेसाठीही जगभरात चर्चा होत आहे. महत्वाचे म्हणजे, एखादा टायर खराब झाला, तरीही ही कार चक्क तीन चाकांवरही धावू शकेल, असा दावा कंपनीने केला आहे. या चिनी कंपनीच्या कारची सुरुवातीची किंमत सुमारे ४३ लाख रुपये सांगण्यात येत आहे.

तीन चाकांवरही दाखवणार दम - 
माध्यमांतील वृत्तांनुसार, चिनी कंपनी BYD ची बाओ ८ ही SUV अत्यंत प्रगत तंत्रज्ञानावर तयार करण्यात आली आहे. कंपनीने या कारमध्ये एक अशी प्रणाली दिली आहे, जी कारचे एखादे चाक खराब झाले तरीही तिचे संतुलण ढळू देत नाही. अर्थात, यदाकदाचित आपत्कालीन स्थिती उद्भवलीच तर ही SUV तीन चाकांवरही काही अंतरापर्यंत सहजपणे प्रवास करू शकेल.

जबरदस्त फीचर्स अन् ढासू रेंज -
कारच्या फीचर्सचा विचार करता, कारमध्ये कंपनीचे प्रगत सस्पेन्शन आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टम दिले आहे. यामुळे रस्त्याच्या स्थितीनुसार कार स्वतःला ॲडजस्ट करू शकेल. यामुळे कार असामान्य स्थितीतही चांगल्या प्रकारे परफॉर्म करेल. 

कारच्या डिझाईनचा विचार करता, ही कार अत्यंत प्रीमियम आणि स्पोर्टी आहे. हिला शार्प LED हेडलाइट्स, मोठी फ्रंट ग्रिल आणि आधुनिक अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. कारच्या इंटीरियरमध्ये मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळण्याची शक्यता आहे. 

तब्बल १३८० किलोमीटरची रेंज -
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या कारमध्ये BYD ची सुरक्षित मानली जाणारी 'ब्लेड बॅटरी' (Blade Battery) वापरण्यात आली आहे. कंपनीनुसार, बाओ ८ ची रेंज तब्बल १३८० किलोमीटर एवढी आहे. यामुळे ही प्रीमियम इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये मोठा धुमाकूळ घालू शकते. या कारमुळे इतर अनेक कंपन्यांचे टेन्शन वाढू शकते.

 

Web Title : BYD बाओ 8: हाई-टेक इलेक्ट्रिक एसयूवी, 1380 किमी रेंज, तीन पहियों पर भी!

Web Summary : BYD की बाओ 8 इलेक्ट्रिक एसयूवी में 1380 किमी की रेंज और आपात स्थिति में तीन पहियों पर चलने की क्षमता जैसे शानदार फीचर्स हैं। उन्नत सस्पेंशन, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टम और प्रीमियम डिजाइन के साथ, यह इलेक्ट्रिक एसयूवी बाजार में हलचल मचा सकती है। कीमत लगभग ₹43 लाख है।

Web Title : BYD's Bao 8: High-tech electric SUV runs 1380km, even on three wheels!

Web Summary : BYD's Bao 8 electric SUV boasts impressive features, including a 1380km range and the ability to drive on three wheels in emergencies. The car features advanced suspension, electronic control systems, and a premium design, potentially disrupting the electric SUV market. Price is around ₹43 lakhs.