शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड यांना तिकीट नाकारल्यानं त्यांचे समर्थक शनिवारी रात्री आंदोलनासाठी 'मातोश्री'कडे कूच करत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यापैकी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. ...
माथाडी कामगार ही संपत्ती असून ती जपण्याचा प्रयत्न करून कामगारांच्या हितालाच कायम प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये राजकीय फायद्यासाठी संघटनेमध्ये फूट पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही माथाडी नेत्यांनी शुक्रवारी वाशी येथे दिली. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शहरवासीयांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवरायांना मानाचा मुजरा केला, त्याकरिता ३४ हून अधिक ठिकाणी शिवरायांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. ...
कामगारांच्या हितासाठी राजकीय मतभेद विसरून संघटनेला प्राधान्य देण्याचा निर्णय माथाडी नेत्यांनी घेतला आहे. यामुळे शनिवारी एपीएमसीमध्ये होणाऱ्या मेळाव्याला कोणत्याच पक्षाच्या मोठ्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलेले नाही. ...
जेएनपीटी कामगार वसाहतीच्या दुरुस्तीचे सुमारे १४४ कोटींचे काम मुदतवाढ देऊनही पूर्ण न झाल्याने ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून जेएनपीटी अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गावर २०११ मध्ये पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर दरम्यान रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, अद्याप हे रु ंदीकरण पूर्ण झालेले नाही. ...