नवी दिल्ली : युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे गणित बिघडले असतानाच, प्रख्यात बँकर आणि उद्योगपती उदय कोटक यांनी भारतीयांना मोठा इशारा दिला आहे. "आर्थिक संकट दारात उभे आहे आणि कोणाकडेही त्याचे उत्तर नाही. आगामी काळात देशाला मोठ्या धक्क्याचा सामना करावा लागेल, त्यासाठी आतापासूनच तयार राहा," असे भाष्य कोटक यांनी केले आहे.
मोठ्या संकटाची चाहूल
कोटक यांनी स्पष्ट शब्दात बजावले की, "धक्का येणार आहे आणि तो खूप मोठा असेल. सध्या ग्राहक शांत असले तरी पडद्यामागे परिस्थिती गंभीर आहे. जोपर्यंत हे युद्ध थांबत नाही, तोपर्यंत अनिश्चितता कायम राहील."
कोटक यांच्या या इशाऱ्यामुळे आता कॉर्पोरेट जगतात आणि सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, आगामी काळ आर्थिक कसोटीचा असणार हे स्पष्ट झाले आहे.
