महामार्गावरील अपघातांत शेकडोंचे बळी, आठ वर्षांत २५० बळी; हजारो जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 04:24 AM2019-03-22T04:24:16+5:302019-03-22T04:24:59+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर २०११ मध्ये पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर दरम्यान रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, अद्याप हे रु ंदीकरण पूर्ण झालेले नाही.

 250 people killed in road accidents in eight years; Thousands of people are injured | महामार्गावरील अपघातांत शेकडोंचे बळी, आठ वर्षांत २५० बळी; हजारो जण जखमी

महामार्गावरील अपघातांत शेकडोंचे बळी, आठ वर्षांत २५० बळी; हजारो जण जखमी

Next

- वैभव गायकर
पनवेल - मुंबई-गोवा महामार्गावर २०११ मध्ये पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर दरम्यान रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, अद्याप हे रु ंदीकरण पूर्ण झालेले नाही. भूसंपादन प्रक्रियेस होणाऱ्या विलंबामुळे कामात अडथळा येत आहे. रुंदीकरणाचा फटका अनेकांना बसला असून, आठ वर्षांत या मार्गावर २५० हून जास्त जणांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे माहितीच्या अधिकाराखाली सामाजिक कार्यकर्ते विशाल राजेमहाडिक यांनी केलेल्या अर्जात ही माहिती उघड झाली आहे. २०१२ ते २०१८ दरम्यान २६२ जणांना रस्ते अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे रुं दीकरण अनेक वर्षे रखडले आहे. भूसंपादन हा मोठा अडथळा ठरला असून, अद्यापही भूसंपादनाचे काम सुरू आहे. तर अनेक ठिकाण भूसंपादित जागेवरील बांधकाम हटविण्यात आलेले नाही.
रुंदीकरणाच्या कामासाठी मार्गावर अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी नागमोडी वळणे तयार झाली आहेत. कोकण, गोव्यात जाण्यासाठी याच मार्गाचा सर्वाधिक वापर होत असल्याने कायम वर्दळ असते. त्यातच सततची रस्त्याची कामे, पावसाळ्यातील खड्डे, मार्गावरील अंधार या कारणांमुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
सरकारी नोंदीनुसार, २०१२ ते २०१८ दरम्यान १२६६ अपघातांत २६२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजारोंच्या वर जखमी झाले आहेत. २०१९ मध्ये तीन महिन्यांतच १५ जणांचे महामार्गावरील अपघातात बळी गेले आहे. १९ डिसेंबर २०११ मध्ये सुप्रीम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला महामार्ग रु ंदीकरणाचे काम दिले. १६ जून २०१४ रोजी पळस्पे ते इंदापूर पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याची डेडलाइन होती. मात्र, अद्याप तीन वेळा डेडलाइन हुकली आहे. २०१४ नंतर २०१६ त्यानंतर २०१८ अशी तिसरी डेडलाइन संपूनदेखील अद्याप काम पूर्ण झालेले नाही. २०१९ ही नव्याने डेडलाइन दिल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे हेमंत फेगडे यांनी दिलेल्या पत्रानुसार स्पष्ट होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणासाठी ९४२.६९ कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात दोन टप्प्यात केल्या जाणाऱ्या या कामाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यास खूप विलंब झाला आहे. पळस्पे ते इंदापूर महामार्गाच्या रुंदीकरणात भूसंपादन सर्वात मोठा अडथळा ठरत असल्याचे पळस्पे-इंदापूर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्त कृती समितीचे समन्वयक संतोष ठाकूर सांगतात. यात मोबदला देण्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून जे खरोखरच बाधित आहेत त्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. तर ज्यांचे घर बाधित नाही, अशांना लाखोंचा मोबदला देऊ केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे.

भूसंपादन गोंधळाचा फटका
भूसंपादन प्रक्रि येतील गोंधळामुळे अद्याप महामार्गाचे रु ंदीकरण रखडले आहे. या भूसंपादन प्रक्रियेत मूळ जागेच्या ठिकाणी वेगळीच जागा दाखविण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. जागा संपादित करण्यात आली असली तरी मोबदला मिळत नसल्याने अनेक शेतकºयांनी बांधकामे हटविण्यास मनाई केल्याचे प्रकार या ठिकाणी सुरू आहेत.
 

Web Title:  250 people killed in road accidents in eight years; Thousands of people are injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.