नॅशनल काँग्रेस पार्टीFOLLOW
National congress party, Latest Marathi News
काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला.