काही ठराविक दिवस वगळल्यास नागपुरात जुलै महिन्यात पावसाळी ढग शांत झाले आहेत. पाऊस होत नसल्याने उष्णता वाढली आहे. विदर्भातील तीन जिल्हे कमी पावसामुळे रेड झोनमध्ये आले आहेत. सध्या विदर्भात २६९.२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. ...
कोरोनाच्या चार महिन्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या ११ दिवसांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ७२९ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात शनिवारी ५५ रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची एकूण संख्या २,२३४ वर पोहचली, तर मृतांची संख्या ...
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार शहरातील आणखी ८ परिसर प्रतिबंधातून मुक्त करण्यात आले आहे. संबंधित परिसरात गेल्या २८ दिवसात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. प्रतिबंध हटल्याने येथील वाहतूक व्यवस्था पूर्वीप्रमाणे सुरू होईल. ...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे अंगणवाडीत येणाऱ्या बालकांच्या ‘ग्रोथ मॉनिटरिंगचे’ काम बंद होते. त्यामुळे बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाने बालकांचे ‘ ...
गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात. पाटणसावंगीतील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकविणाऱ्या प्राध्यापकाने ही बाब पुन्हा एकदा स्पष्ट सिद्ध केली. प्रा. निखिल मानकर नामक या प्राध्यापकांनी चक्क तेलाच्या पिंपाला इलेक्ट्रॉनिक्स सर्किट जोडून अतिशय नाममात्र खर्च ...
विदर्भातील पुष्प उत्पादक शेतकऱ्यांच्या सीताबर्डी भागातील महात्मा फुले पुष्प बाजारात घाणीचे साम्राज्य असल्याने विक्रेते आणि शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाचे दुर्लक्ष असल्याने कचराघर तुडुंब भरले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात ही बाब जीवघेणी अस ...
कुख्यात गुन्हेगारांच्या एका टोळीने कटकारस्थान रचून प्रतिस्पर्ध्याची सिनेस्टाईल हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिस्पर्धी तरुणाच्या मित्रांनी प्रसंगावधान राखल्यामुळे भीषण हत्येचा गुन्हा टळला. २४ तासानंतर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकड ...