नागपुरात ८ परिसर मूक्त तर १० सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 09:32 PM2020-07-11T21:32:59+5:302020-07-11T22:59:33+5:30

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार शहरातील आणखी ८ परिसर प्रतिबंधातून मुक्त करण्यात आले आहे. संबंधित परिसरात गेल्या २८ दिवसात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. प्रतिबंध हटल्याने येथील वाहतूक व्यवस्था पूर्वीप्रमाणे सुरू होईल.

In Nagpur, 8 premises are free and 10 are sealed | नागपुरात ८ परिसर मूक्त तर १० सील

नागपुरात ८ परिसर मूक्त तर १० सील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार शहरातील आणखी ८ परिसर प्रतिबंधातून मुक्त करण्यात आले आहे. संबंधित परिसरात गेल्या २८ दिवसात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. प्रतिबंध हटल्याने येथील वाहतूक व्यवस्था पूर्वीप्रमाणे सुरू होईल. तसेच दुकाने व प्रतिष्ठानेही नियम व अटीनुसार सुरू करता येतील. शनिवारी शहरातील १० नवीन परिसर सील करण्यात आले. आता शहरात एकूण १७० च्या जवळपास परिसरात सील लावण्यात आलेले आहे तर ४८ परिसरातील सील हटवून प्रतिबंधातून मुक्त करण्यात आले आहे.
या परिसरातील हटले प्रतिबंध

शिवाजी नगर सिमेंट रोड, पॅरामाऊंट हाईट्स, प्रभाग-१५, धरमपेठ झोन
सावित्रीबाई फुले नगर, प्रभाग ३२, हनुमाननगर झोन
नागपूर विभागीय सेंट्रल रेल्वे, आरबीआय क्वॉर्टर, प्रभाग ३५, धंतोली झोन
तुमडीपुरा, तांडापेठ, प्रभाग २०, सतरंजीपुरा झोन
पाठराबे वाडी, बिनाकी मंगळवारी, प्रभाग-५, सतरंजीपुरा झोन
मॉडेल टाऊन, प्रभाग ७, आसीनगर झोन
बाबा बुद्धाजी नगर रोड टेका, प्रभाग ६, आसीनगर झोन
रिपब्लिकन नगर न्यू इंदोरा, प्रभाग ७, आसीनगर झोन

सील करण्यात आलेला भाग
हनुमानगर झोनमधील प्रभाग ३२ येथील एमएसईबी मैदान, नवीन सुभेदार ले-आऊट, प्रभाग २९ येथील दुबेनगर, हुडकेश्वर, लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रभाग-३८ एसबीआय कॉलनी, हिंगणा रोड, प्रभाग ३८ येथील नालंदा बौद्ध विहारजवळ जयताळा, धरमपेठ झोन प्रभाग १५ येथील कुंभार टोली, हम्पयार्ड रोड, सीताबर्डी, मंगळवारी झोन प्रभाग-९ मोहन नगर, खलासी लाईन, लकडगंज झोन प्रभाग-२४ ओम अपार्टमेंट, सूर्यनगर आणि डिप्टी सिग्नल पाण्याच्या टाकीजवळ, वक्रतुंड अपार्टमेंट, गांधीबाग झोन प्रभाग २२ येथील नबाबपुरा ढोबळे गल्ली, मुंजे सभागृहाजवळ

Web Title: In Nagpur, 8 premises are free and 10 are sealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.