मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
गुजरात, तमिळनाडू आणि कर्नाटकसारख्या राज्यांनी आपापल्या भाषांची सक्ती केली म्हणूनच त्यांच्या भाषा टिकल्या. महाराष्ट्रात मात्र साठ वर्षांपासून मराठीची सक्ती करण्यात आपण अपयशी ठरलो. ...
सर्व स्तरांतून मराठीची होणारी अवहेलना लक्षात घेऊन ‘मराठीच्या भल्यासाठी-मराठीचे व्यासपीठ’अंतर्गत एकत्र आलेल्या २४ संघटनांच्या प्रतिनिधींनी सोमवारी सकाळी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. ...
कन्नड, तामीळ या भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे. त्याप्रमाणे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा; यासाठी शिवसेनेच्या वतीने बिंदू चौक येथे सोमवारी सकाळी सामुदायिक शपथ घेण्यात आली. ...
मराठी व्याकरण तज्ज्ञ दिवाकर मोहनी व त्यांच्या पत्नी सुनंदा मोहनी यांनी देवनागरीलिपी, तिची वर्णमाला, तिच्यातील जोडाक्षरांची रचना समजण्यास सुलभ व्हावे यासाठी व्हिडिओज यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून समाजासमोर आणले आहेत. ...
मुंबई विद्यापीठाने मालवणी भाषेचा अभ्यासक्रमात समावेश केला. या भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मुंबई विद्यापीठ कायम प्रयत्नशील असेल, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सहाव्या मालवणी बोली साहित्य संमेलनात रविवारी दिले. ...
‘मराठी असे आमुची माय बोली’, किंवा ‘माझ्या मराठीचे बोलू, अमृताचेही पैजा जिंकी’ केवळ असे म्हणून मराठी भाषेचा विकास होणार नाही़ तर त्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न करावे लागतील़ सरकारी पातळीवर त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत परंतु त्याच बरोबर वैयक्तिक पातळी ...