परिसरातील महापालिका हद्दीतील चाडेगाव शिवारात शनिवारी (दि.२०) रात्रीच्या सुमारास चार वर्षे वयाची बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली. गेल्याच आठवड्यात याच शिवारात नर जातीचा बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला होता. ...
बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील मौजा इटोली येथील लताबाई गोपाळ देवतळे यांच्या घरी कुत्र्याच्या शोधात बिबट्याने घरात प्रवेश केला. यामुळे देवतळे कुटुंबीय व शेजाऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली. सदर घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. ...
बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी मुंबई - गोवा महामार्गावरील कामथे घाटात रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे. ...
सिन्नर तालुक्यातील मेंढी शिवारात सोमठाणे रस्त्यावर बिबट्याचा मृत बछडा आढळून आला. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली. सुमारे चार महिने वयाच्या बिबट्याचा उपासमारीने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...