बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
नुकताच एनसीबी अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा करिश्माला चौकशीसाठी समन्स पाठवला होता. पण आता अधिकाऱ्यांनी सांगितलं की, करिश्मा कुठे आहे याचा काहीच पत्ता नाही. ...
Deepika Padukone Drug enquiry: गेल्याच महिन्यात दीपिकाची एनसीबीने चौकशी केली होती. एका व्हायरल चॅटमुळे दीपिकाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली होती. ...
२०१९ मध्ये करण जोहरच्या घरी झालेल्या एका पार्टीचा व्हिडीओ चर्चेत आला होता. हा व्हिडीओ पाहून आरोप लावण्यात आले होते की, व्हिडीओत असलेले सगळे स्टार ड्रग्सच्या नशेत आहेत आणि या पार्टीत ड्रग्सचा वापर झाला होता. ...