Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य

कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य

Godrej New Boss: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपनं (GIG) सोमवारी आपल्या वरिष्ठ नेतृत्वात मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. १२७ वर्षे जुन्या या व्यावसायिक साम्राज्याची धुरा आता अधिकृतपणे नव्या पिढीच्या हाती सोपवण्यात आलीये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 13:31 IST2026-04-14T13:24:01+5:302026-04-14T13:31:30+5:30

Godrej New Boss: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपनं (GIG) सोमवारी आपल्या वरिष्ठ नेतृत्वात मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. १२७ वर्षे जुन्या या व्यावसायिक साम्राज्याची धुरा आता अधिकृतपणे नव्या पिढीच्या हाती सोपवण्यात आलीये.

Who is Pirojsha godrej Who took over the reins of 127 year old Godrej business an empire worth Rs 1 56 lakh crore | कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य

कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य

Godrej New Boss: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपनं (GIG) सोमवारी आपल्या वरिष्ठ नेतृत्वात मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. १२७ वर्षे जुन्या या व्यावसायिक साम्राज्याची धुरा आता अधिकृतपणे नव्या पिढीच्या हाती सोपवण्यात येत असून, पिरोजशा गोदरेज या वर्षी ऑगस्टमध्ये समूहाचे नवीन चेअरमन म्हणून पदभार स्वीकारतील.

पिरोजशा गोदरेज हे आदी आणि परमेश्वर गोदरेज यांचे सुपुत्र आहेत. १४ ऑगस्टपासून ते 'गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप' (GIG) आणि 'गोदरेज इंडस्ट्रीज'चे चेअरपर्सन म्हणून जबाबदारी सांभाळतील. या नवीन जबाबदारीसोबतच ते गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज कॅपिटल आणि गोदरेज व्हेंचर्सचे चेअरपर्सन म्हणूनही कार्यरत राहतील. आपली नियुक्ती ही जबाबदारी आणि सौभाग्य असल्याचं पिरोजशा यांनी म्हटलंय.

गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?

नादिर गोदरेज यांची निवृत्ती आणि नवीन भूमिका

विद्यमान चेअरमन नादिर गोदरेज हे पिरोजशा यांच्याकडे सूत्रे सोपवल्यानंतर 'मानद अध्यक्ष' (Chairman Emeritus) म्हणून काम पाहतील. नादिर गोदरेज ऑगस्ट २०२६ मध्ये ७५ वर्षांचे झाल्यानंतर पूर्णपणे निवृत्त होतील. त्यावेळी ते गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज ॲग्रोवेट, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आणि गोदरेज प्रॉपर्टीजच्या संचालक मंडळातून बाहेर पडतील. त्यांनी सोमवारपासूनच 'एस्टेक लाईफसायन्सेस'च्या चेअरपर्सनपदही सोडलंय.

नेतृत्वातील इतर महत्त्वाचे बदल

बुर्जिस गोदरेज : नादिर गोदरेज यांचे सुपुत्र बुर्जिस १४ ऑगस्टपासून 'गोदरेज ॲग्रोवेट'चे चेअरपर्सन होतील. त्यांनी एस्टेक लाईफसायन्सेसच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) पदाचा राजीनामा दिला असून ते आता तेथे बिगर-कार्यकारी संचालक राहतील.

विशाल शर्मा : गोदरेज केमिकल्सचे विद्यमान सीईओ विशाल शर्मा यांची एस्टेक लाईफसायन्सेसचे नवीन चेअरपर्सन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अरिजीत मुखर्जी : एस्टेक लाईफसायन्सेसचे मुख्य परिचालन अधिकारी (COO) अरिजीत मुखर्जी यांची कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली जाईल.

गोदरेज कुटुंबातील व्यवसायाची विभागणी

२०२४ मध्ये गोदरेज कुटुंबाचा व्यवसाय दोन मुख्य भागांमध्ये विभागला गेला :

१. गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप (GIG) :
हा भाग आदी गोदरेज आणि नादिर गोदरेज या भावांच्या वाट्याला आला. यामध्ये एफएमसीजी, रिअल इस्टेट, वित्तीय सेवा आणि रसायनांचा समावेश आहे. पिरोजशा गोदरेज आता याच समूहाचे प्रमुख असतील.

२. गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुप (GEG) : हा भाग जमशेद गोदरेज आणि स्मिता कृष्णा यांना मिळाला. या समूहाकडे एरोस्पेस, संरक्षण, ऊर्जा आणि सुरक्षा क्षेत्रातील व्यवसाय आहेत. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, गोदरेज कुटुंबाची एकूण संपत्ती १६.७ बिलियन डॉलर (सुमारे १,५६,३९९ कोटी रुपये) इतकी आहे.

Web Title : पिरोजशा गोदरेज 127 साल पुराने गोदरेज समूह का नेतृत्व करेंगे।

Web Summary : गोदरेज समूह ने पिरोजशा गोदरेज को नादिर गोदरेज की जगह अध्यक्ष नियुक्त किया। 1.56 लाख करोड़ रुपये की संपत्ति वाले 127 साल पुराने समूह का नेतृत्व परिवर्तन। नादिर चेयरमैन एमेरिटस बने, 2026 तक पूरी तरह सेवानिवृत्त। बुर्जिस गोदरेज और विशाल शर्मा को मिली महत्वपूर्ण भूमिकाएँ। पारिवारिक व्यवसाय जीआईजी और जीईजी में विभाजित।

Web Title : Pirojsha Godrej to lead 127-year-old Godrej Group.

Web Summary : Godrej Group appoints Pirojsha Godrej as Chairman, succeeding Nadir Godrej. The 127-year-old conglomerate, with assets worth ₹1.56 lakh crore, transitions leadership. Nadir becomes Chairman Emeritus, retiring fully by 2026. Burjis Godrej and Vishal Sharma get key roles. The family business divided into GIG and GEG.