Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?

गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?

Gold Outlook Akshaya Tritiya: भारतात सोनं खरेदी करणं हा केवळ आर्थिक निर्णय नसून तो एक सांस्कृतिक आणि शुभ संकेत मानला जातो. धनत्रयोदशी, दिवाळी आणि अक्षय तृतीया यांसारख्या सणांना सोनं खरेदी केल्यानं समृद्धी आणि सौभाग्य लाभते अशी मान्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 11:48 IST2026-04-14T11:46:17+5:302026-04-14T11:48:07+5:30

Gold Outlook Akshaya Tritiya: भारतात सोनं खरेदी करणं हा केवळ आर्थिक निर्णय नसून तो एक सांस्कृतिक आणि शुभ संकेत मानला जातो. धनत्रयोदशी, दिवाळी आणि अक्षय तृतीया यांसारख्या सणांना सोनं खरेदी केल्यानं समृद्धी आणि सौभाग्य लाभते अशी मान्यता आहे.

Gold price giving tremendous returns on Akshaya Tritiya for the last 9 years will history repeat itself this time too | गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?

गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?

Gold Outlook Akshaya Tritiya: गेल्या अक्षय तृतीयेपासून (एप्रिल २०२५) भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत ६० टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. सलग नवव्या वर्षी सोन्यानं गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलाय. भारतात सोनं खरेदी करणं हा केवळ आर्थिक निर्णय नसून तो एक सांस्कृतिक आणि शुभ संकेत मानला जातो. धनत्रयोदशी, दिवाळी आणि अक्षय तृतीया यांसारख्या सणांना सोनं खरेदी केल्यानं समृद्धी आणि सौभाग्य लाभते अशी मान्यता आहे. यावर्षी १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय तृतीया साजरी होत आहे.

यावर्षी जानेवारीत सोन्याने प्रति १० ग्रॅम १,८०,००० रुपयांचा विक्रमी स्तर गाठला होता. त्यानंतर किमतीत घसरण झाली असून सध्या सोने १,५०,००० रुपयांच्या आसपास आहे. म्हणजेच विक्रमी पातळीपेक्षा सोनं आता ३०,००० रुपयांनी स्वस्त झालंय. वाढत्या महागाईच्या चिंतेमुळे आणि नफा वसुलीमुळे किमतीत बदल झाले असले, तरी तज्ज्ञांच्या मते गुंतवणूक करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन

बाजारातील मागणी आणि तज्ज्ञांचं मत

कमोडिटी तज्ज्ञ कावेरी मोरे यांच्या मते, अक्षय तृतीयेपूर्वी मागणी मजबूत आहे, परंतु वाढलेल्या किमतींमुळे सामान्य ग्राहकांच्या मोठ्या खरेदीवर मर्यादा आल्या आहेत. मुंबईतील एका सराफा व्यापाऱ्याच्या मते, सध्या बाजारात म्हणावा तसा उत्साह दिसत नाही. जागतिक स्तरावर चीनमध्ये मागणी कमी असली तरी, तिथली मध्यवर्ती बँक सलग १७ महिन्यांपासून सोनं खरेदी करत आहे, जे सोन्यावरील विश्वास दर्शवते.

गुंतवणुकीचा सल्ला: सुरक्षितता की परतावा?

मार्केट एक्सपर्ट्सच्या मते, सोन्याच्या किमती वाढण्याचा वेग मंदावू शकतो, पण मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि भू-राजकीय तणाव पाहता सोने हा फायदेशीर गुंतवणूक पर्याय कायम आहे. 'INVasset PMS' चे हर्षल दासानी यांच्या मते, सोन्याकडे केवळ परतावा देणारी गुंतवणूक म्हणून न पाहता पोर्टफोलिओला स्थिरता देणारं साधन म्हणून पहावं. गेल्या वर्षीसारखाच मोठा परतावा याही वर्षी मिळेल, असं गृहीत धरणं कठीण आहे.

कशा प्रकारे करावी गुंतवणूक?

तज्ज्ञांनी असा सल्ला दिला आहे की, सोन्यामध्ये एकदम मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी टप्प्याटप्प्याने (SIP पद्धतीने) गुंतवणूक करावी. जर तुमच्याकडे आधीच सोनं नसेल, तर थोडी गुंतवणूक करणं योग्य ठरेल. मात्र, केवळ एका वर्षात मोठ्या परताव्याच्या आशेनं आक्रमक गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ नाही.

भविष्यातील संभाव्य किमती

तांत्रिक विश्लेषणानुसार, सोन्याची तेजी कायम राहिल्यास ते १,५५,००० रुपये आणि त्यानंतर १,७०,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकतं. येणाऱ्या महिन्यांत ते पुन्हा १,८१,००० रुपयांचा स्तर गाठण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, किमती घसरल्यास १,३६,२०० रुपयांचा पहिला सपोर्ट असून १,२७,५०० रुपये हा मजबूत आधार मानला जात आहे.

Web Title: Gold price giving tremendous returns on Akshaya Tritiya for the last 9 years will history repeat itself this time too