फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 13:22 IST2026-04-14T13:21:47+5:302026-04-14T13:22:31+5:30

महत्वाचे म्हणजे या कारच्या एकूण विक्रीत वार्षिक ४.१ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे...

Want to buy a family car Maruti Ertiga 7-seater worth Rs 8 lakhs 80 thousands has become the number 1, beating Toyota and Mahindra; See the top-10 list | फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी

फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी

भारतीय बाजारात ७-सीटर कारची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. विशेषतः मारुती सुजुकी अर्टिगा, टोयोटा इनोवा आणि महिंद्रा बोलेरो यांसारख्या वाहनांना जबरदस्त पसंती मिळत आहे. नुकत्याच संपलेल्या FY2026 मध्ये मारुती सुजुकी अर्टिगा ही १९८८७६ युनिट्सच्या विक्रीसह पहिल्या क्रमांकावर राहिली. महत्वाचे म्हणजे या कारच्या एकूण विक्रीत वार्षिक ४.१ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओ दुसऱ्या तर टोयोटा रूमियन दहाव्या क्रमांकावर -
विक्रीचा विचार करता, महिंद्रा स्कॉर्पिओ १७८८०० युनिट्ससह दुसऱ्या क्रमांकावर तर टोयोटा इनोव्हा ११२१८८ युनिट्ससह तिसऱ्या आणि महिंद्रा बोलेरो ११०१३६ युनिट्सच्या विक्रीसह चौथ्या क्रमांकावर राहिली. तर, पाचव्या क्रमांकावर महिंद्रा XUV 7XO (८७,४१२ युनिट्स) असून तिच्या विक्रीत ६.१ टक्क्यांची घट झाली आहे.

याशिवाय, किआ कॅरेंस ७६,८३७ युनिट्ससह सहाव्या स्थानी असून तिच्या विक्रीत १८.९ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. यानंतर मारुती XL6 (३७,१५९ युनिट्स), टोयोटा फॉर्च्यूनर (३५,२१६ युनिट्स), रेनॉल्ट ट्रायबर (२५,१७४ युनिट्स) आणि दहाव्या क्रमांकावर टोयोटा रूमियन (२४,४२५ युनिट्स) चा क्रमांक लागतो.

अर्टिगाचे खास वैशिष्ट्ये -
मारुती अर्टिगामध्ये १.५ लीटर पेट्रोल इंजिन असून यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्स असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. जर हिच्या पेट्रोल व्हेरिअंटचा विचार केला तर, हिचे पेट्रोल व्हिरिअंट २०.३ ते २०.५१ किमी/लीटर पर्यंत मायलेज देते. ही कार सीएनजीमध्येही उपलब्ध असून तिचे मायलेज प्रति किलो २६.११ किमीपर्यंत आहे. भारतीय बाजारपेठेत अर्टिगाची एक्स-शोरूम किंमत ८.८० लाख ते १३.१३ लाख रुपयांपर्यंत जाते.

Web Title : Maruti Ertiga 7-सीटर कारों की बिक्री में शीर्ष पर, टोयोटा-महिंद्रा को पछाड़ा

Web Summary : Maruti Ertiga FY2026 में 198,876 यूनिट्स की बिक्री के साथ 7-सीटर कारों में शीर्ष पर रही, 4.1% की वृद्धि। महिंद्रा स्कॉर्पियो और टोयोटा इनोवा पीछे रहे। Ertiga पेट्रोल और CNG विकल्प में, कीमत ₹8.80 लाख से शुरू।

Web Title : Maruti Ertiga Tops 7-Seater Sales, Outshining Toyota and Mahindra

Web Summary : Maruti Ertiga leads FY2026 7-seater sales with 198,876 units, a 4.1% increase. Mahindra Scorpio and Toyota Innova followed. Ertiga offers petrol and CNG options, priced from ₹8.80 lakhs.