Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 13:32 IST2026-04-14T13:00:13+5:302026-04-14T13:32:36+5:30

Ashok Kharat Case : अशोक खरातला पुन्हा एकदा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. खरात याला व्हिडीओ कॉन्फरसिंग'द्वारे नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले.

Ashok Kharat Case Police will find clues about Ashok Kharat's drug dealing Court orders 5-day custody | Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी

Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी

Ashok Kharat Case  : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. खरात याच्या तिसऱ्या गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीची मुदत संपली, आज खरात याला नाशिक जिल्हा न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयाने आज खरात याला पाच दिवसांपासांठी (१८ एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.  पोलीस अशोक खरात याने महिलांना दिलेल्या गुंगीच्या औषधाचा तपास करायचा आहे. यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. 

बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री

आजची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. पण सुरुवातीला तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे सुनावणी काही काळ थांबवण्यात आली होती. यावेळी न्यायाधीशांनी खरातला पोलीस मारहाण करतात का? असा प्रश्न केला. यावेळी खरातने मारहाण केली नसल्याचे सांगितले.

सरकारी वकील अॅड. शैलेंद्र बागडे यांनी गुन्ह्याची भीषणता मांडली. आरोपी खरात स्वत:ला देवाचा अवतार म्हणवून महिलांना जाळ्यात ओढत होता. तो महिलांना गुंगीचे औषध प्यायला द्यायचा आणि लैंगित शोषण करायचा. खरात गुंगीच्या औषधात नेमके काय मिसळायचा याची माहिती पोलिसांना घ्यायची आहे, यासाठी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची गरज असल्याचे न्यायालयाला सांगितले.

यावेळी खरातच्या वकीलांनी पोलीस कोठडीला विरोध केला. मागील गुन्ह्यांमध्येही पोलिसांनी असाच युक्तिवाद केला होता आणि तो तपास झाला असल्याचा दावा त्यांनी केली. यामुळे पुन्हा कोठडीची गरज नसल्याचे वकील सचिन भाटे यांनी सांगितले.

Web Title : अशोक खरात की हिरासत बढ़ी: पुलिस नशीली दवाओं की जांच कर रही है

Web Summary : अशोक खरात की पुलिस हिरासत नासिक मामले में पांच दिनों के लिए बढ़ाई गई। अदालत ने महिलाओं के शोषण के लिए इस्तेमाल की जाने वाली दवाओं पर विवरण मांगा। खरात ने पुलिस दुर्व्यवहार के आरोपों से इनकार किया। जांच जारी है।

Web Title : Ashok Kharat's Custody Extended: Police Investigate Drugging, Seek More Information

Web Summary : Ashok Kharat's police custody extended by five days in Nashik case. Court seeks details on drugs used to exploit women. Kharat denies police abuse allegations. Investigation continues to uncover the truth.