"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 14:21 IST2026-04-14T14:21:05+5:302026-04-14T14:21:39+5:30
"यांची मिलीभगत आहे आणि अजूनही मला असे वाटते की, काही पुरावे बाहेर येणार आहेत. पण मी तुम्हाला सांगते त्या आधी त्यांच काहीतरी हेच लोक करवतील," अशी शंकाही प्रणिती यांनी यावेळी व्यक्त केली.

"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
मला वाटते, खरातांचा (अशोक खरात) कुठेतरी काहीतरी एन्काऊंटर करतील, कारण खूप नावे समोर येणार आहेत. ज्यांच्याशी ते जोडले गेले आहेत. अशी शंका व्यक्त करत, आता जे सत्ताधारी आहेत, मंत्री आहेत, त्यांना घेऊनही ही नावे येणार आहेत, असा मोठा दावा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. त्या सोलापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर, प्रत्रकारांशी बोलत होत्या.
जर तुमचे विचारचच महिलांच्या विरोधात असतील, तर... -
प्रणिती म्हणाल्या, "एकीकडे आपण महिला आरक्षणाच्या विषयावर बोलतो. पण दुसरीकडे महिलांच शोषण होत असेल, तर मग खरंच काय तुम्ही कोणत्या पद्धतीत... आरक्षण वर होतं? पण ते खालपर्यंत जर तुमचे विचारचच महिलांच्या विरोधात असतील, तर तुम्ही आरक्षण कसं लागू कराल? असा सवालही यावेळी प्रणिती शिंदे यांनी केला.
"यांची मिलीभगत आहे आणि अजूनही मला असे वाटते की, काही पुरावे बाहेर येणार आहेत. पण मी तुम्हाला सांगते त्या आधी त्यांच काहीतरी हेच लोक करवतील," अशी शंकाही प्रणिती यांनी यावेळी व्यक्त केली.
खरातला चौथ्या गुन्ह्यात ५ दिवसांची पोलीस कोठडी -
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. खरात याला सोमवारी तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर, खरात यास चौथ्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी न्यायालयात तपास अधिकाऱ्यांनी अर्ज सादर केला होता. यानंतर आता आज खरातला नाशिक जिल्हा न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. आता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची (१८ एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अशोक खरात याने महिलांना दिलेल्या गुंगीच्या औषधाचा तपास करायचा आहे. यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती.