दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 12:41 IST2026-04-14T12:36:47+5:302026-04-14T12:41:00+5:30

चीन सातत्याने दक्षिण चीन समुद्रात आपले सैन्य बळ वाढवत असून या भागातील सुरक्षेची चिंता वाढली आहे.

Why did 17 thousand soldiers gather in the South China Sea?; 7 countries are preparing to directly challenge China dominance | दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी

दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी

दक्षिण चीन समुद्रातील वाढत्या तणावात अमेरिका आणि फिलीपिन्सने 'बालिकातन' या नावाने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संयुक्त लष्करी सरावाची घोषणा केली आहे. येत्या २० एप्रिल ते ८ मे  या काळात होणाऱ्या या सरावात १७,००० हून अधिक सैनिक सहभागी होणार असून हा आकडा गेल्या वर्षीच्या १६,००० सैनिकांच्या विक्रमाला मागे टाकेल. हा सराव अमेरिका आणि फिलीपिन्समधील सैन्य सहकार्याचे प्रतिबिंब आहे. ज्यात ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा, फ्रान्स आणि न्यूझीलंडसारख्या देशांचा समावेश आहे. त्याशिवाय १७ इतर देश या प्रमुख लष्करी सरावाचे निरीक्षण करतील. 

टागालॉग भाषेत 'बालिकातन' म्हणजे 'खांद्याला खांदा लावून', जो भागीदारी आणि एकत्रित शक्तीचा संदेश देतो. अमेरिकन मरीन कॉर्प्सनुसार, या सरावात सागरी सुरक्षा, बंदराचे रक्षण आणि संयुक्त युद्ध मोहीमसारख्या धोरणात्मक क्षमतांचा अभ्यास केला जाईल. त्यात लष्कर, नौदल, हवाई आणि सायबर क्षेत्रातील युद्ध कौशल्य आणखी वाढवण्यावर भर असेल. सोबतच मल्टीनॅशनल सागरी सरावात युद्धनौकांद्वारे लाइव्ह फायरिंग, एंटी सबमरीन ऑपरेशन आणि सर्च अँन्ड रेस्क्यू ड्रिलचाही समावेश असेल. 

हा सैन्य सराव अशावेळी होत आहे जेव्हा इराण अमेरिका आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातही ३ वर्षापासून युद्ध सुरू आहे. त्यातच चीन सातत्याने दक्षिण चीन समुद्रात आपले सैन्य बळ वाढवत असून या भागातील सुरक्षेची चिंता वाढली आहे. चीनने कृत्रिम बेटे बनवत लष्करी पायाभूत सुविधा उभारलेल्या मिशीफ रीफ आणि सुबी रीफ या दोन वादग्रस्त क्षेत्रांवर निगराणी करताना चिनी सैन्याने त्यांच्या तटरक्षक दलाच्या विमानांवर फ्लेअर्स डागले असा फिलीपिन्सने अलीकडेच असा आरोप केला आहे. चिनी बोटी सेकंड थॉमस शोलमध्ये सायनाइड टाकत होत्या, ज्यामुळे तेथील त्यांच्या लष्करी तळाचे नुकसान होऊ शकते असंही मनिलाने दावा केला. चीनने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, फिलीपिन्सने आपल्या संरक्षण धोरणात बदल केला असून अंतर्गत सुरक्षेपेक्षा बाह्य धोक्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. यामुळेच हा 'बालिकातन' सराव पूर्वीपेक्षा अधिक व्यापक आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे जपान प्रथमच या युद्ध सरावात सक्रियपणे सहभागी होणार आहे. यापूर्वी ते केवळ निरीक्षक म्हणून सहभागी झाले होते. जपान आणि फिलीपिन्स यांच्यातील अलीकडील संरक्षण करारामुळे हा सहभाग शक्य झाला आहे. एकंदरीत हा भव्य लष्करी सराव केवळ प्रादेशिक सुरक्षा संतुलनावरच परिणाम करणार नाही तर चीनला अमेरिका आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील त्यांच्या मित्र राष्ट्रांमधील सामरिक भागीदारी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होत आहे असा एक स्पष्ट संदेशही देईल. 

Web Title : दक्षिण चीन सागर में 17,000 सैनिक: क्या चीन को चुनौती?

Web Summary : दक्षिण चीन सागर में तनाव के बीच अमेरिका और फिलीपींस ने सबसे बड़ा 'बालिकातन' अभ्यास किया। सात देशों की भागीदारी, मजबूत इंडो-पैसिफिक रणनीतिक साझेदारी का संकेत, चीन के बढ़ते प्रभाव को चुनौती।

Web Title : 17,000 Troops Gather in South China Sea: Challenge to China?

Web Summary : US and Philippines conduct largest 'Balikatan' exercise amid South China Sea tensions. Seven nations participate, signaling stronger Indo-Pacific strategic partnership and challenging China's growing influence in the region.